अभिषेक बच्चन हा बॉलीवूडमधील बहुआयामी अभिनेत्यांपैकी एक मानला जातो. तो नेहमीच वैविध्यपूर्ण चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत असतो. काही दिवसांपूर्वीच त्याचा ‘घूमर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. तर या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानची एक आठवण अभिनेत्री सैयामी खेरने शेअर केली आहे.

अभिषेक आणि सैयामीची प्रमुख भूमिका असलेला घूमर हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडला. या चित्रपटातील काही भागाचं शूटिंग पुण्यात झालं. तर यावेळी अभिषेक बच्चनने मिरचीचा ठेचा भाजीसारखा खाल्ला असं सैयामी म्हणाली.

आणखी वाचा : Video: “बिग बीही मिसळ खातात का?” निलेश साबळेच्या प्रश्नावर अभिषेक बच्चनने केला खुलासा, म्हणाला…

अभिषेक बच्चन हा खूप खवय्या आहे. त्याचा मिसळ प्रेम तर आपल्या सर्वांनाच परिचयाचं आहे. पण मिसळीइतकाच त्याला भाकरी आणि ठेचाही खूप आवडतो. सैयामीने नुकतीच एक मुलाखत दिली. त्यात तिने अभिषेकचं हे ठेचा-भाकरी प्रेम सर्वांसमोर आणलं.

हेही वाचा : “अभिषेक-करिश्मा यांचं लग्न मोडलं कारण…” दिग्दर्शक सुनील दर्शन यांनी २० वर्षांनी केला खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ती म्हणाली, “आर बाल्की आणि अभिषेक बच्चन हे दोघेही खवय्ये आहेत. या चित्रपटाचं काही शूटिंग आम्ही पुण्यात करत होतो तेव्हा अभिषेकने ठेचा आणि भाकरीवर ताव मारला. मिर्चीचा ठेचा त्याला भाजीसारखा खाल्ला आणि ते पाहताना मजा आली.” तर आता तिचं हे बोलणं चर्चेत आलं आहे.