पॉर्नस्टार म्हणून सुरुवात करणाऱ्या सनी लिओनीने आपला मार्ग बदलत बॉलिवूडकडे वाटचाल केली. ‘बेबी डॉल’ या आयटम साँगने तिला बॉलिवूडमध्ये भरभरून प्रसिद्धी दिली. या गाण्यानंतर तिचं आयुष्यच बदललं. सनी लिओनी ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. नुकतंच सनी लिओनीने एका ट्रेंडींग गाण्यावर डान्स केला आहे. तिचा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

‘पतली कमरिया मोरी हाय हाय’ या गाण्यानं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. तरुणांना वेड लावणारं हे गाणं दिवसेंदिवस लोकप्रिय होताना दिसत आहे. या गाण्यावर अनेक कलाकार, सोशल मीडिया स्टार भन्नाट डान्स करून रील्स इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. याच गाण्यावर अभिनेत्री सनी लिओनीने भन्नाट डान्स केला आहे.
आणखी वाचा : “मी मराठी सिनेमाचा चोखंदळ प्रेक्षक म्हणून…” ‘वाळवी’ चित्रपट पाहिल्यानंतर हेमंत ढोमेची ‘ती’ पोस्ट चर्चेत

सनी लिओनीने इन्स्टाग्रामवर एक रिल व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत ती तिच्या टीमबरोबर नाचताना दिसत आहे. यात सनी लिओनी ही ५ क्रू मेंबर्सबरोबर दिसत आहे. यावेळी तिने भगव्या रंगाच्या ड्रेस परिधान केला आहे. यात सनी ही या गाण्याची हुकस्टेप करताना दिसत आहे.

आणखी वाचा : वाळवी चित्रपट कसा वाटला? प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला “मी कितीही वेळा…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान सनी लिओनीने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिच्या चाहत्यांशी संवाद साधताना दिसते. कॅनडामध्ये जन्मलेली सनी लिओनी मूळची भारतीय आहे. तिने २०११ साली डॅनिअल वेबरशी लग्न केलं होतं. २०१७ साली तिने महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यातील एका अनाथालयातून मुलगी निशाला दत्तक घेतलं. त्यानंतर २०१८ मध्ये सनी आणि डॅनिअलनं सरोगसीद्वारे अशर आणि नोआ या दोन मुलांना जन्म दिला. एकेकाळी पॉर्न स्टार असलेली सनी आज बॉलिवूड अभिनेत्री आणि ३ मुलांची आई आहे.