बॉलिवूडच्या अभिनेत्री आणि फोटोग्राफर यांच्यात कायमच खटके उडत असतात. बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांचा एक एक व्हिडीओ व्हायरल झाला होता ज्यात त्यांनी फोटोग्राफरना खडे बोल सुनावले होते. आता बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री तापसी पन्नू सध्या चर्चेत आहे. पत्रकार, फोटोग्राफर यांच्याबरोबर तिचे सध्या वाद होताना दिसत आहे.

२६ ऑक्टोबर रोजी फोटोग्राफर तिचे फोटो काढण्यासाठी थांबले होते. मात्र तापसी येताच तिने थेट आपल्या गाडीकडे मोर्चा वळवला आणि गाडीत बसण्यासाठी गेली तेव्हा फोटोग्राफर तिचे फोटो काढण्यासाठी गेले तेव्हा तिने ‘असं करू नका असं करू नका’, म्हणत तिने गाडीचा दरवाजा बंद केला. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी तिची तुलना जया बच्चन यांच्याशी केली.

पारंपरिक वेशात आयराने दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा; नेटकरी म्हणाले, “साडीला जरा…”

नुकतीच तिने एका बॉलिवूडच्या पार्टीला हजेरी लावली होती. या निमित्ताने तिने पुन्हा एकदा पत्रकारांशी संवाद साधला आहे. मात्र यावेळी तिने पत्रकारांना सांगितले की आज ओरडू नका, तुम्ही जर असे वागलात तर मी तुमच्यावर नाही ओरडणार. असं तिने पत्रकारांना सांगितले. याचा व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दाक्षिणात्य चित्रपटानंतर आता तापसीने बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. तापसीने आजवर वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. शाबाश मिठू, हसीन दिलरुबा, थप्पड, जुडवा २, पिंक या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तापसी मूळची दिल्लीची असून पेशाने ती इंजिनियर आहे, मात्र तिने आपल्या करियरची सुरवात मॉडेलिंग क्षेत्रापासून केली आहे. आजवर तिने अनेक पुरस्कार पटकविले आहेत.