तापसी पन्नूने २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘चश्मे बद्दूर’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. यावर्षी तापसीच्या बॉलीवूडमधील करिअरला १० वर्ष पूर्ण झाली आहेत. अभिनेत्रीने आतापर्यंतच्या प्रवासात ‘पिंक’, ‘थप्पड’, ‘मुल्क’ यांसारख्या दर्जेदार चित्रपटांमध्ये काम केले आहे. कोणतीही बॉलीवूड पार्श्वभूमी नसताना तिचा इथवर पोहोचण्याचा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. अलीकडेच तापसी पन्नूने बॉलीवूडमधील घराणेशाहीचा तिच्यावर कसा परिणाम झाला याबाबत भाष्य केले आहे.

हेही वाचा : Video : ‘टायगर ३’मध्ये सलमान खान करणार जबरदस्त स्टंट; प्रदर्शनापूर्वी सेटवरील ‘तो’ व्हिडीओ लीक

‘हिंदुस्थान टाईम्स’ला दिलेल्या मुलाखतीत तापसीने सांगितले की, “बॉलीवूडमध्ये काही विशिष्ट ग्रुप असतात याबाबत आता लोकांनाही माहिती आहे. मित्रमंडळीचा एक ग्रुप, विशिष्ट एजन्सीच्या हाताखाली काम करणाऱ्या कलाकारांचा एक ग्रुप असे अनेक ग्रुप आहेत, परंतु प्रत्येक कलाकाराला आपल्या आवडत्या भूमिकेची निवड करण्याचा अधिकार असला पाहिजे.”

हेही वाचा : “तुला लाज नाही वाटली?”, तमन्ना भाटियाचा बोल्ड सीनचा पाहून नेटकरी संतापले; म्हणाले…

तापसी पुढे म्हणाली, “इंडस्ट्रीत सर्वकाही चांगले असेल याचा मी कधीच विचार केला नव्हता. या प्रवासात माझ्याबरोबर अनेकदा भेदभाव करण्यात आला अर्थात, कायम भेदभाव होणार याचीही कल्पना होती, म्हणून याबाबत मी कधीच तक्रार केली नाही. या इंडस्ट्रीतील वातावरण बहुतेक वेळा तुमच्या विरोधात असते याची कल्पना असूनही तुम्हाला बॉलीवूडचा एक हिस्सा व्हायचे असेल, तर ती तुमची स्वत:ची निवड आहे यासाठी तुम्ही कोणालाच तक्रार करू शकत नाही.”

हेही वाचा : “रावण अली खिलजी, प्रभू येशू, उर्फी जावेद अन्…”, ‘आदिपुरुष’ पाहून नेटकरी संतापले; म्हणाले, “ओम राऊत तू…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“इंडस्ट्रीमध्ये काम करायचे असेल, तर तुम्हाला स्वत:ला सिद्ध करावे लागते. प्रत्येक चित्रपटासाठी संघर्ष करावा लागतो. एका ब्लॉकबस्टर चित्रपटामुळे तुमचे संपूर्ण आयुष्य बदलत नाही. स्वतःचे स्थान निर्माण करण्यासाठी आपल्याला सतत चांगले काम करत राहावे लागते,” असे तापसी पन्नूने सांगितले. दरम्यान, तापसी लवकरच बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरुख खानबरोबर दिग्दर्शक राजकुमार हिरानींच्या ‘डंकी’ चित्रपटात झळकणार आहे.