बॉलीवूडमध्ये असे अनेक कलाकार होऊन गेलेत, ज्यांनी मोजकेच चित्रपट केले आणि त्यातून खूप नाम कमावलं पण नंतर मात्र ते सिनेसृष्टीपासून दुरावले. अशीच एक अभिनेत्री म्हणजे तल्लुरी रामेश्वरी होय. तिने नसीरुद्दीन शाह, जितेंद्र, मिथून यांच्याबरोबर काम केलं पण नंतर तिच्या आयुष्यात एक घटना अशी घडली की तिला अभिनयाला रामराम करावा लागला. अभिनय सोडल्यानंतर ती उद्योजिका बनली.

८० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री तल्लुरी रामेश्वरीने आपल्या दमदार अभिनयाने सिनेसृष्टीत स्वतःचं स्थान निर्माण केलं. ती करिअरमध्ये यशाच्या शिखरावर असताना अशी घटना घडली की तिने काम करणं थांबवलं. बर्‍याच चित्रपट निर्मात्यांची ती आवडती अभिनेत्री होती. पण त्या घटनेनंतर तिला कोणत्याही चित्रपटाची ऑफर मिळत नव्हती. परिणामी काही वेळातच ती अभिनयापासून दूर गेली. मग तिने पंजाबी चित्रपट दिग्दर्शकांशी लग्न केलं, पण तिने पंजाबी चित्रपटांमध्ये काम केले नाही.

Video: सॉफ्टवेअर इंजिनिअरशी लग्न करून परदेशात थाटला संसार, अभिनेत्रीने गृहप्रवेश करत दाखवली नव्या घराची झलक

‘डीएनए’ ने दिलेल्या वृत्तानुसार, रामेश्वरीने एफटीआयआयमधून १९७५ पदवी पूर्ण केली आणि १९७७ मध्ये तिला राजश्रीच्या ‘दुल्हन वही जो पिया मन भये’ मध्ये मोठा ब्रेक मिळाला. हा चित्रपट खूप मोठा हिट ठरला आणि ती घराघरात लोकप्रिय झाली. यानंतर तिने नसीरुद्दीन शाहबरोबर ‘सुनयना’, मिथुनसह ‘मेरा रक्षक’ आणि जितेंद्र यांच्याबरोबर ‘शारदा’ आणि ‘आशा’ या चित्रपटांमध्ये काम केलं. याच दरम्यान रामेश्वरीच्या घोड्यावरून पडली आणि या अपघातात तिचा एक डोळा गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर डॉक्टरांनी तिला शस्त्रक्रियेसाठी न्यूयॉर्कला पाठविण्यात. या काळात तिने बरेच चित्रपट गमावले आणि शेवटी अभिनय सोडला.

Video: महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाला डेट करतेय जान्हवी कपूर, प्रेमाची कबुली दिल्यानंतर शिखरसह पोहोचली देवदर्शनाला

तिच्या करिअरमध्ये असे चढ-उतार पाहिल्यानंतर रामेश्वरीने पंजाबी अभिनेता-निर्माता दीपक सेठशी केलं पण पंजाबी उद्योगात कधीही काम केलं नाही. रामेश्वरीला पंजाबी चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली होती पण तिने ती नाकारली, असं म्हटलं जातं. अभिनय सोडल्यानंतर ती चित्रपट जगतापासून दूर एक गेली आणि उद्योजिका बनली. ‘निमली नॅचरल’ नावाचा तिचा स्किनकेअरचा व्यवसाय आहे. कंपनी नैसर्गिक स्किनकेअर आणि अरोमाथेरपी उत्पादनं तयार करते. ती व्यवसायाची धुरा यशस्वीरित्या सांभाळत आहे.