अभिनेत्री विद्या बालनने आजवर बॉलिवूडला अनेक सुपरहिट चित्रपट दिले. तिच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत. पण त्याचबरोबरीने विद्याच्या सौंदर्याचेही सगळेच जण तोंडभरुन कौतुक करतात. सध्या ती चित्रपटसृष्टीपासून दूर असली तरी सोशल मीडियाद्वारे चाहत्यांच्या संपर्कात असते. विद्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. पण या प्रवासादरम्यान तिला अनेक कठिण प्रसंगांचाही सामना करावा लागला.

आणखी वाचा – Video : ४५ वर्षांची मैत्री तुटली! सतीश कौशिक यांच्या पार्थिवाजवळ बसून ढसाढसा रडले अनुपम खेर, व्हिडीओ व्हायरल

Neha Hiremath Murder Fayaz Karnataka
“त्याला अशी शिक्षा…”, नेहाचा खून करणाऱ्या फयाजच्या वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
Neha Hiremath Murder Fayaz Karnataka
नेहा हिरेमठ हत्या प्रकरण; भाजपाचा लव्ह जिहादचा आरोप तर काँग्रेसने म्हटले, “प्रेमसंबधातून…”
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
economy of engineering sector marathi news
अर्थचक्राचे शिल्पकार – अभियांत्रिकी आणि भांडवली उद्योग क्षेत्र

कास्टिंग काऊच सारख्या प्रकाराचा अनेक अभिनेत्रींनी सामना केला आहे. याचबाबत विद्यानेही अलिकडे दिलेल्या एका मुलाखतीमध्ये भाष्य केलं आहे. विद्याने सांगितलं की, “माझ्याबरोबर घडलेला एक प्रकार मला अजूनही आठवतो. मी एक चित्रपट साइन केला होता. एका जाहिरातीचं चित्रीकरण करण्यासाठी मी चेन्नईमध्ये गेले होते. त्याचदरम्यान ज्या चित्रपटासाठी मी होकार दिला त्याच चित्रपटाच्या दिग्दर्शकाने मला भेटायला बोलावलं”.

“चित्रपटासाठी होकार कळवला म्हणून मीही त्या दिग्दर्शकाला भेटायला गेले. आम्ही एका कॉफी शॉपमध्ये भेटलो. पण एका रुममध्ये चल यासाठी ते मला जबरदस्ती करू लागले. मी एकटीच होते. पण मी एक युक्तीवाद केला. जेव्हा आम्ही एका रुममध्ये गेलो तेव्हा त्या रुमचा दरवाजा मी उघडा ठेवला. त्यामुळेच त्या दिग्दर्शकाने माझ्याबरोबर कोणतंच वाईट कृत्य केलं नाही”.

आणखी वाचा – इंदौरमध्ये केलेलं थाटामाटात लग्न, १९ वर्षांच्या संसारानंतर मराठमोळ्या सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा घटस्फोट, म्हणाली, “मानसिक त्रास…”

पुढे ती म्हणाली, “दिग्दर्शकाने मला कोणताच इशारा केला नाही. पण त्याच्या वागण्यामधून आपण इथे सुरक्षित नाही याची जाणीव मला झाली होती. मला त्या रुममधील वातावरणही आवडलं नव्हतं. परिणामी माझ्या हातून तो चित्रपटही गेला”. विद्याने त्या दिग्दर्शकाचं नाव न सांगता हा धक्कादायक प्रकार सगळ्यांसमोर सांगितला.