scorecardresearch

‘आदिपुरुष’मधील रावण पात्राबद्दल दिग्दर्शक ओम राऊतची स्पष्ट भूमिका, म्हणाला “माझ्यासाठी रावण आजही…”

‘आदिपुरुष’ला होणारा विरोध पाहून चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत यांनी त्यांची भूमिका मांडली आहे.

‘आदिपुरुष’मधील रावण पात्राबद्दल दिग्दर्शक ओम राऊतची स्पष्ट भूमिका, म्हणाला “माझ्यासाठी रावण आजही…”
‘आदिपुरुष’ला होणारा विरोध पाहून आता चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत यांनी त्यांची भूमिका मांडली आहे.

बहुचर्चित ‘आदिपुरुष’ चित्रपट टीझरपासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. व्हिएफएक्स आणि कलाकारांच्या लूकवरुन चित्रपटाला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. ‘आदिपुरुष’मधील सैफ अली खानचा रावणाच्या भूमिकेतील अवतार पाहून नेटकऱ्यांनी त्याची तुलना पद्मावत चित्रपटातील खिलजी या पात्राशी केली आहे. अनेकांनी या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणीही केली आहे. ‘आदिपुरुष’ला होणारा विरोध पाहून आता चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊतने त्याची भूमिका मांडली आहे.

‘आदिपुरुष’ चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊतने नुकतीच इंडिया टुडेला मुलाखत दिली. तो म्हणाला, “या चित्रपटातून श्रीराम यांची गोष्ट सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यांचे विचार तरुण पिढीपर्यंत या माध्यमातून पोहोचवू इच्छितो. आजच्या नवीन पिढीला श्रीरामांची शिकवण द्यायची असेल तर आपल्यालाही त्यांची विचारसरणी, नवीन टेक्नोलॉजीचा वापर करूनच चित्रपटाची निर्मिती करावी लागेल. आम्ही चित्रपटात काहीही चुकीचे दाखविलेले नाही. प्रत्येक गोष्टीचं पावित्र्य चित्रपट बनवताना राखलं गेलं आहे”.

हेही वाचा >> ‘आदिपुरुष’ चित्रपटातील रावणाच्या लूकनंतर आता पोस्टरची चर्चा, अ‍ॅनिमेशन स्टुडिओकडून कॉपी केल्याचा दावा

ओम राऊतने मुलाखतीत रावण या पात्राच्या लूकमागील त्याची भूमिकाही स्पष्ट केली. “आपण याआधी रावणाला कसं पाहिलं आहे, यावर ते अवलंबून आहे. माझ्यासाठी रावण आजही राक्षस आहे. परंतु, मी एका वेगळ्या नजरेने त्याच्याकडे बघतो. मी कल्पना केलेल्या रावणाला मोठी मिशी नाही आहे. पण यामुळे जर तुम्ही असं म्हणत असाल की, रावणाचं रंग आणि रुप मी बदललं आहे, तर ते चुकीचं आहे. कारण हा तोच धर्माचा रंग आहे”, असं तो म्हणाला.

हेही पाहा >> Photos : ‘नवा गडी नवं राज्य’ मालिकेतील सोज्वळ ‘आनंदी’चा बोल्ड लूक पाहिलात का?

‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या टीझरमध्ये दाखविण्यात आलेल्या पुष्पक विमानचे रुप बदलण्याच्या चर्चेवरही ओम राऊतने भाष्य केले. “ते पुष्पक विमान आहे, हे तुम्हाला कोणी सांगितलं? तुम्ही फक्त चित्रपटातील ९५ सेकंद पाहिली आहेत.”, असं तो म्हणाला. चित्रपटाला ट्रोल करण्यात आल्यावरूनही त्यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देत तो म्हणाला, “चित्रपटाबद्दल करण्यात येत असलेल्या प्रत्येक वक्तव्यावर आमचं लक्ष आहे. परंतु, जानेवरीमध्ये जेव्हा चित्रपट प्रदर्शित होईल, तेव्हा मी तुम्हाला निराश करणार नाही”.

हेही वाचा >> Video : बॉलिवूड गाण्यांवर रिल्स बनवणाऱ्या किली पॉलसह माधुरी दीक्षितने धरला ठेका, व्हिडीओ व्हायरल

‘आदिपुरुष’ चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता प्रभास, बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सनॉन, अभिनेता देवदत्त नागे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट २०२३च्या जानेवारी महिन्यात प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या