‘आदिपुरुष’ या चित्रपटाची गेले अनेक दिवस प्रचंड चर्चा आहे. या चित्रपटात अभिनेता प्रभास प्रभू श्रीरामांची भूमिका साकारणार आहे, तर अभिनेत्री क्रिती सेनॉन या चित्रपटामध्ये सीतेच्या भूमिकेत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. तर त्या पाठोपाठ प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील पहिल्या गाण्याला प्रेक्षक तुफान प्रतिसाद देत आहेत. यानंतर आता या चित्रपटाचे निर्माते प्रेक्षकांसाठी खास सरप्राईज घेऊन येणार आहेत. हे सरप्राईज म्हणजे या चित्रपटातील दुसरं गाणं.

‘आदिपुरुष’च्या ट्रेलरमध्ये बॅकग्राऊंडला ऐकू येणारं ‘जय श्रीराम’ हे गाणं काही दिवसांपूर्वीच समोर आलं. संगीत क्षेत्रातील लोकप्रिय मराठमोळी जोडी अजय-अतुल यांनी हे गाणी संगीतबद्ध केलं आहे. या गाण्याने व्ह्यूजच्या बाबतीत नवीन विक्रम केला. तर आता यानंतर या चित्रपटातील दुसरं गाणं ‘राम सिया राम’ या चित्रपटाचे निर्माते प्रेक्षकांसमोर घेऊन येणार आहेत.

The Phenom Story A Dream Come True entrepreneur Srikanth bolla
फेनम स्टोरी: स्वप्न सत्यात उतरवणारा श्रीकांत
Watch waiter’s priceless reaction to sketch artist's sweet surprise
न मिळालेल्या कौतुकाची पोचपावती! कलाकारानं हॉटेलच्या बिलवर रेखाटलं वेटरचं सुरेख चित्र; चेहऱ्यावर उमटलं सुंदर हास्य, Video Viral
washim lok sabha seat, Govinda s Roadshow in Washim, Receives low Response, mahayuti, canidate rajshri patil, election campaign, govinda Disappointed Fans,
गोविंदाचा रोड शो फसला, कारमध्येच बसून असल्याने नागरिकांची नारेबाजी…..
82 year old CSK fan's tribute post for MS Dhoni wins internet
“मी धोनीसाठी आले आहे!”, ८२ वर्षीय आजीची सर्वत्र हवा! Viral Video एकदा बघाच

आणखी वाचा : प्रदर्शनाच्या आधीच ‘आदिपुरुष’चा होणार वर्ल्ड प्रीमियर, जाणून घ्या कधी, कुठे आणि कोणाला पाहता येणार चित्रपट?

‘राम सिया राम’ २९ मे रोजी हिंदी, तेलुगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम या भाषांत रिलीज होणार आहे. हे गाणं संगीत क्षेत्रातील आजची आघाडीची जोडी साचेत-परंपरा यांनी संगीतबद्ध केलं असून ते त्यांनीच गायलं आहे, तर मनोज मुंतशिर शुक्ला या गाण्याचे गीतकार आहेत. पहिल्या गाण्याप्रमाणेच या गाण्याच्या रिलीजसाठीदेखील निर्माते हटके प्लॅन करत आहेत. २९ मे रोजी दुपारी बारा वाजता सर्व म्युझिक चॅनल, फिल्म चॅनल, रेडिओ स्टेशन आणि सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हे गाणं वाजवण्यात येणार आहे.

हेही वाचा : ओम राऊतने उघड केलं ‘आदिपुरुष’ चित्रपटाबद्दलचं मोठं गुपित; म्हणाला, “‘मार्व्हल’ आणि ‘अवतार’ सारखे…”

दरम्यान, ‘आदिपुरुष’ हा बहुप्रतीक्षित चित्रपट १६ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन ओम राऊतने केलं आहे. या चित्रपटाची सर्वत्र प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.