मराठमोळा दिग्दर्शक ओम राऊत याचा ‘तान्हाजी’ हा चित्रपट प्रचंड गाजला आणि प्रेक्षकांनी त्याला भरपूर प्रतिसाद दिला. त्यानंतर आता त्याच्या ‘आदिपुरुष’ चित्रपटाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या चित्रपटात अभिनेता प्रभास प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत दिसणार आहे, तर अभिनेत्री क्रिती सेनॉन सीतेच्या भूमिकेत दिसेल. मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे या चित्रपटात हनुमानाची भूमिका साकारणार आहे. आता या चित्रपटाच्या बाबतीत एक मोठी माहिती समोर आली आहे.

ओम राऊत गेले अनेक महिने या चित्रपटावर काम करत आहे. हा चित्रपट रामायणावर आधारित आहे. या चित्रपटावर केल्या गेलेल्या टीकेनंतर या चित्रपटाच्या निर्मात्यांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली. आता हा चित्रपट १६ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. पण त्याआधी या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर पार पडणार असल्याचं समोर आलं आहे.

marathi actor Makarand Anaspure appeared in the look of CM Eknath Shinde in the movie Juna Furniture
‘जुनं फर्निचर’ चित्रपटात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या लूकमध्ये झळकले ‘हे’ प्रसिद्ध अभिनेते, पाहा फोटो
The Phenom Story A Dream Come True entrepreneur Srikanth bolla
फेनम स्टोरी: स्वप्न सत्यात उतरवणारा श्रीकांत
cannes film festival, FTII, short film,
प्रतिष्ठित कान चित्रपट महोत्सवात पुण्याच्या एफटीआयआयचा लघुपट
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!

आणखी वाचा : ‘आदिपुरुष’ चित्रपटासाठी मिळालेल्या मानधनाबाबत देवदत्त नागेचा मोठा खुलासा, म्हणाला…

नुकतीच ‘ट्रिबेका फिल्म फेस्टिव्हल’मध्ये सामील असणाऱ्या चित्रपटांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यात ‘आदिपुरुष’चाही समावेश आहे. या चित्रपटाची वर्ल्ड प्रीमियरसाठी निवड झाली आहे. त्यानुसार या चित्रपटाचा प्रीमियर ट्रिबेका फिल्म फेस्टिवल, न्यू यॉर्क येथे १३ जून रोजी होईल. तसंच या फिल्म फेस्टिव्हलला उपस्थित असणाऱ्यांना हा चित्रपट पाहता येईल. या प्रतिष्ठित फिल्म फेस्टिव्हलमध्ये निवड झाल्याबद्दल या चित्रपटाची टीम खूप खूश आहे.

हेही वाचा : “मस्जिदचा मौलवी वाटतोय…”; देवदत्त नागेच्या ‘आदिपुरुष’मधील लूकवर टीका करणाऱ्याला प्रसिद्ध मराठी अभिनेता सडेतोड उत्तर देत म्हणाला, “काही चुकीचे…”

दरम्यान, गेल्या वर्षी दसऱ्याच्या दिवशी ‘आदिपुरुष’ चित्रपटाचा एक टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. मात्र या टीझरमध्ये दाखवल्या गेलेल्या दृश्यांवर जोरदार टीका झाली आणि अखेर निर्मात्यांनी या चित्रपटाच्या दृश्यांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला. अनेक बदल केल्यानंतर आता हा चित्रपट १६ जून रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होईल.