मराठमोळा दिग्दर्शक ओम राऊत यांच्या बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘आदिपुरुष’ या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा आहे. नुकताच ‘आदिपुरुष’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अभिनेता प्रभास हा प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत दिसणार आहे, तर अभिनेत्री क्रिती सेनॉन सीतेचे पात्र साकारत आहे.

हैदराबादमध्ये ‘आदिपुरुष’ या चित्रपटाच्या ट्रेलरचे खास स्क्रीनिंग करण्यात आले होते. त्यानंतर आता प्रेक्षकांसाठी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. या ट्रेलरच्या सुरुवातीला हनुमान हा गुहेत तपश्चर्या करत असल्याचे दिसत आहे. त्यानंतर मग श्रीराम, लक्ष्मण हे सीतेसह वनवासात जातात. राम आणि लक्ष्मण शबरीने दिलेली उष्टी बोरे खाताना दिसत आहेत. तसेच लक्ष्मणाची प्रकृती ठीक व्हावी यासाठी द्रोणागिरी पर्वत उचलून आणण्यापासून ते राम-लक्ष्मण वानरसेनेसह रामसेतूवरून लंकेला जाताना सर्व गोष्टींची झलक यात दाखवण्यात आली आहे.
आणखी वाचा : “प्रभू श्रीरामांनीच मला…” ‘आदिपुरुष’च्या हिंदी डबिंगबद्दल शरद केळकर स्पष्टच बोलला

या ट्रेलरच्या सर्वात शेवटी रावणाची झलक दाखवण्यात आली आहे. या चित्रपटावर झालेल्या टीकेनंतर या चित्रपटाच्या व्हीएफएक्समध्ये बरेच मोठे बदल करण्यात आले आहेत. या चित्रपटातील रावणाचा लुकही बदलण्यात आल्याचे बोललं जात आहे.

या चित्रपटात अभिनेता प्रभास हा प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत दिसणार आहे, तर अभिनेत्री क्रिती सेनॉन सीतेच्या भूमिकेत दिसेल. मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे या चित्रपटात हनुमानाची भूमिका साकारणार आहे.

आणखी वाचा : “माझे वडील रिक्षा चालवायचे, आई घरी शिवणकाम करायची; पण ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मुळे…” शिवाली परबचा खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या वर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. पण या चित्रपटाचा टीझर पाहून यामध्ये दाखवल्या गेलेल्या दृश्यांमुळे या चित्रपटावर टीका केली गेली. या टीकेनंतर या चित्रपटाच्या निर्मात्यांनी प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली. आता हा चित्रपट १६ जून रोजी प्रदर्शित होणार आहे.