बॉलीवूडमध्ये कास्टिंग काउचचे प्रकार घडतात. याबाबत अनेक अभिनेत्री जाहीरपणे बोलताना दिसतात, त्यांचे अनुभवही सांगतात. मध्यंतरी आलेल्या ‘मीटू’ मोहिमेत तर अनेक जुन्या प्रकरणांचा खुलासा अभिनेत्रींनी केला होता. त्यानंतर आता सुपरमॉडेल व अभिनेत्री अदिती गोवित्रीकरने तिला आलेला अनुभव सांगितला आहे. तडजोडीसाठी नकार दिल्याने तिला परदेशातून मुंबईला परत पाठवण्यात आलं होतं, असं ती म्हणाली.

सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत घडलेला प्रकार सांगत अदिती म्हणाली, “मी एका मोठ्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी दक्षिण आफ्रिकेला गेले होते. आणि तरीही मला समजलं नाही की ती व्यक्ती मला तडजोड करण्यास सांगत आहे. आणि मी त्याच्या तोंडावर हसले आणि तिथून निघून गेले. तू वेडा आहेस का की मूर्ख आहेस? असं काही तरी बोलून मी निघून गेले आणि यामुळे त्याचा अहंकार दुखावला गेला. त्याने दुसऱ्या दिवशी मला आणि माझ्या टीमला पॅकअप करून मुंबईला परत पाठवलं. मला तर समजलंही नाही की नेमकं काय घडलंय.”

“मी त्याच्याबरोबर बसून…”, घटस्फोटाच्या १३ वर्षांनी प्रसिद्ध अभिनेत्रीने व्यक्त केली पूर्वाश्रमीच्या पतीला भेटायची इच्छा

“मग मला मीटिंगसाठी बोलावण्यात आलं कारण आम्ही तीन-चार दिवस शूटिंग केलं होतं. मीटिंगमध्ये त्यांनी मला चित्रपटातून काढण्याची अगदी फालतू कारणं दिली. सगळी कारणं खोटी होती. मी म्हटलं ठीक आहे. त्यानंतर माझ्या लक्षात आलं की हे सगळं का घडलं, मी तडजोड करायला नकार दिल्यामुळेच मला चित्रपटातून काढून टाकण्यात आलं होतं,” असं अदितीने सांगितलं.

“आमची रोज भांडणं होतात”, ऐश्वर्या रायने केलेला खुलासा; अभिषेक बच्चन म्हणालेला, “आयुष्य खूप…”

दरम्यान, बॉलीवूडमध्ये कास्टिंग काउच हा प्रकार नवीन नाही. अनेक अभिनेत्रींनी आजवर त्यांना आलेले वाइट अनुभव सांगितले आहेत. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री इशा गुप्ताने तिच्याबरोबर घडलेला प्रसंग सांगितला होता. “चित्रपट अर्धा शूट करून झाला होता. मी नकार दिल्यावर सहनिर्मात्याने निर्मात्याला सांगितलं की मला त्याला मी चित्रपटात नको आहे मग मी सेटवर काय करत आहे? यानंतर काही निर्मात्यांनी मला चित्रपटात कास्ट करण्यासही नकार दिला. जर मी काहीच तडजोड करणार नसेल तर मला चित्रपटात घेण्याचा काय फायदा? असंही या निर्मात्यांना माझ्याबद्दल बोलताना मी ऐकलं होतं,” असं इशा म्हणाली होती.