मॉडेल-अभिनेत्री आदिती गोवित्रीकरचा तिचा पूर्वाश्रमीचा पती मुफ्फझल लकडावालापासून घटस्फोट होऊन १३ वर्षे झाली आहेत. पण ती आताही त्या घटस्फोटाच्या आठवणींमधून सावरू शकलेली नाही. या जोडप्याने १९९८ मध्ये लग्न केलं होतं आणि २००९ मध्ये त्यांचे ११ वर्षांचे वैवाहिक जीवन संपुष्टात आले. त्यांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे. दोघांचे पालनपोषण अदितीने एकटीने केले.

एका मुलाखतीत तिच्या घटस्फोटाबद्दल बोलताना अदिती म्हणाली, “माझे अपयशी लग्न हे माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण टप्प्यांपैकी एक आहे. मला जिंकायला आवडतं. लहानपणापासून मला जिंकायचं होतं, मला वर्गात पहिलं यायचं होतं, मला फियर फॅक्टर जिंकायचे होते, मला बिग बॉस जिंकायचे होते. त्यामुळे माझं लग्न मोडलंय हे पचवणं माझ्यासाठी खूप कठीण होतं. माझ्याबरोबर असं का घडलं? हेच विचार मला यायचे.”

“आमची रोज भांडणं होतात”, ऐश्वर्या रायने केलेला खुलासा; अभिषेक बच्चन म्हणालेला, “आयुष्य खूप…”

“माझीही कुठेतरी चूक झाली असावी, याची जाणीव मला झाली, कारण टाळी एका हाताने वाजत नाही,” असं ती म्हणाली. “माझी इच्छा आहे की एखाद्या दिवशी मी त्याच्याबरोबर (पूर्वाश्रमीचा पती) बसून घटस्फोटाबद्दल बोलेन. कारण कधीकधी भांडणानंतर आपल्याला तो विषय कुठेतरी संपवणं गरजेचं असतं. आमच्यात एकमेकांना न सांगितल्या गेलेल्या अनेक गोष्टी आहेत, त्यामुळे कदाचित कधीतरी आम्ही बोलू. आम्ही बोलून विषय संपवणं हे फक्त आम्हा दोघांसाठीच नाही तर मुलांसाठीही चांगलं होईल. आता १३ वर्षे झाली आहेत, पण तुम्ही तुमचा भूतकाळ विसरू शकत नाही. आठवणी तुम्हाला भूतकाळात गुंतवून ठेवतात,” असं अदिती म्हणाली.

वडिलांचा खून, आईलाही गमावलं; मुलगी IAS झाली अन् ३१ वर्षांनी…

सध्या तिची दोन मुलं त्यांच्या वडिलांच्या संपर्कात आहेत, पण त्यांना तिने एकटीने मोठं केलं. “त्यांना एकटं वाढवणं खूप कठीण होतं. माझं बालपण खूप आनंदी होतं. माझे आईवडील आमच्यासाठी एकत्र निर्णय घेत असत. मुलांनी सहलीला जायचे की नाही या गोष्टीही ते एकत्र ठरवायचे, पण मला मात्र सर्व काही एकटीला ठरवावं लागायचं. मला आई आणि वडील दोन्ही भूमिका कराव्या लागल्या. कामासाठी मुलांना माझ्या आई किंवा बहिणीकडे सोडल्याबद्दल मला अपराधीपणाची भावना मनात यायची,” असं अदितीने सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कास्टिंग काउचबद्दल अदितीचा खुलासा

या मुलाखतीत घडलेला प्रकार सांगत अदिती म्हणाली, “मी एका मोठ्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी दक्षिण आफ्रिकेला गेले होते. आणि तरीही मला समजलं नाही की ती व्यक्ती मला तडजोड करण्यास सांगत आहे. आणि मी त्याच्या तोंडावर हसले आणि तिथून निघून गेले. तू वेडा आहेस का की मूर्ख आहेस? असं काही तरी बोलून मी निघून गेले आणि यामुळे त्याचा अहंकार दुखावला गेला. त्याने दुसऱ्या दिवशी मला आणि माझ्या टीमला पॅकअप करून मुंबईला परत पाठवलं. मला तर समजलंही नाही की नेमकं काय घडलंय. कालांतराने माझ्या लक्षात आलं की हे सगळं का घडलं, मी तडजोड करायला नकार दिल्यामुळेच मला चित्रपटातून काढून टाकण्यात आलं होतं,” असं अदितीने सांगितलं.