अभिनेत्री अदिती राव हैदरीचा पूर्वाश्रमीचा पती सत्यदीप मिश्राने फॅशन डिझायनर व अभिनेत्री असलेल्या मसाबा गुप्ताशी जानेवारी महिन्यात लग्न केलं. काही वर्षांच्या रिलेशनशिपनंतर घरीच मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत त्यांनी लग्नगाठ बांधली. त्यानंतर आता अदिती राव हैदरीच्या अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

मसाबा गुप्ताने अदिती राव हैदरीच्या पहिल्या पतीशी केलंय दुसरं लग्न; जाणून घ्या कोण आहे सत्यदीप मिश्रा

अदिती राव हैदरी दाक्षिणात्य अभिनेता सिद्धार्थबरोबर रिलेशनशिपमध्ये असल्याचं म्हटलं जात आहे. गेल्या वर्षभरापासून या दोघांच्या अफेअरच्या चर्चा होत आहेत. दोघेही ‘महा समुद्रम’ नावाच्या तेलुगू चित्रपटात एकत्र काम करताना भेटले आणि प्रेमात पडले, असे दावे काही मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आले होते. याशिवाय सिद्धार्थ व अदिती अनेकदा एकत्र स्पॉट झाले होते, त्यानंतर या दोघांमध्ये फक्त मैत्री नाही, तर ते प्रेमात असल्याच्या चर्चांनी जोर धरला.

“आता पुन्हा कधीच…” शिवसेना गमावल्यानंतर उद्धव ठाकरेंवर कंगना रणौतची सडकून टीका

अलीकडेच अदिती राव हैदरीला याबद्दल विचारण्यात आलं. ‘इन्स्टंट बॉलिवूड’ या पापाराझी अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये अदिती राव हैदरीला तिच्या सिद्धार्थशी अफेयरच्या बातम्यांमध्ये किती तथ्य आहे? असं विचारण्यात आलं. त्यावर अदितीने ‘आता मला खूप भूक लागली आहे आणि जेवायला जात आहे’ असं उत्तर दिलं. तिने सिद्धार्थबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देणं टाळलं.

View this post on Instagram

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अदिती व सिद्धार्थ दोघेही घटस्फोटित आहेत. अदिती सत्यदीप मिश्रापासून विभक्त झाली. तर, सिद्धार्थने २००३ मध्ये त्याची गर्लफ्रेंड मेघनाशी लग्न केलं होतं, पण २००६ मध्ये ते वेगळे झाले आणि २००७ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर श्रुती हासन आणि समांथा रुथ प्रभू यांच्यासह काही अभिनेत्रींबरोबर सिद्धार्थचं नाव जोडलं गेलं होतं.