Ahaan Panday Convinced Director Mohit Suri To Cast Aneet Padda In Saiyaara : सध्या सर्वत्र ‘सैयारा’ चित्रपटाची क्रेझ आहे. बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटातून अहान पांडे व अनित पड्डा यांनी बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. पण, तुम्हाला माहीत आहे का? ‘सैयारा’मध्ये अनित पड्डाची निवड कशी झाली होती. तिला यामधील तिचा सहकलाकार अहान पांडेमुळेच काम करण्याची संधी मिळाली होती.

मोहित सुरी यांनी ‘सैयारा’ चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. यापूर्वीसुद्धा त्यांनी तयार केलेल्या प्रेमपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता. आता त्यांच्या ‘सैयारा’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळतोय. मोहित सुरी यांनी या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान मुलाखत दिली होती. त्यामध्ये त्यांनी अहान पांडे व अनित पड्डा यांच्याबद्दल सांगितलं आहे. त्यामध्ये त्यांनी अनित पड्डानं दिलेलं ऑडिशन त्यांना फार आवडलं नसल्याचं सांगितलं आहे.

मोहित सुरी यांनी ‘इन्स्टंट बॉलीवूड’ला मुलाखत दिली आहे. त्यामध्ये त्यांनी या चित्रपटात अहान पांडेमुळे अनित पड्डाची निवड झाल्याचं सांगितलं आहे. ते म्हणाले, “तिची माझ्याबरोबरची पहिली भेट खूप वाईट होती. अहान तेव्हा माझ्याबरोबर होता. अहाननेच मला तिला एक संधी द्या यासाठी आग्रह केला”.

मोहित सुरी अहानबद्दल म्हणाले, “अहानने मला, तिला एक संधी द्या. ती चांगली आहे. मी तिच्याबरोबर एक सीन केला आहे, असं म्हणत चित्रपटासाठी तिची निवड करावी याकरता आग्रह धरला. तेव्हा मी अनितला बोलावलं. तेव्हा ती आली त्यावेळी तिनं पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि जीन्स परिधान केली होती. तिला पाहिल्यानंतर माझं असं झालं की, हेच तर हवंय. जर तुम्ही चित्रपटाचा टीझर पाहिलात, तर त्यातही तिचा असाच साधा लूक आहे”.

सैयारा या चित्रपटातून अनित पड्डानं मुख्य नायिका म्हणून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. यापूर्वी तिनं ‘बिग गर्ल डोंट क्राय’ या वेब सीरिजमध्ये काम केलं होतं. त्यासह ती ‘सलमान वेंकी’मध्येही झळकली होती. परंतु, ती खऱ्या अर्थानं ‘सैयारा’ या चित्रपटामुळेच प्रसिद्धीझोतात आली. त्यातील तिच्या कामामुळे अनेकांनी तिचं कौतुक केलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘सैयारा’च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचं झालं, तर ‘सैयारा’ १८ जुलै रोजी प्रदर्शित झाला होता. पहिल्या दिवशी या चित्रपटानं २१.५ कोटींचा गल्ला जमवला. पुढे तीन दिवसांत या चित्रपटानं ८३.२५ इतक्या कोटींच्या तिकिटांची विक्री केली. या चित्रपटाद्वारे मिळालेल्या एकूण रकमेबद्दल बोलायचं झालं, तर ‘सैयारा’नं आतापर्यंत १०५.७५ कोटींची रक्कम जमा केली आहे.