Aishwarya Rai & Abhishek Bachchan Video : अभिषेक व ऐश्वर्या राय बच्चन यांची जोडी बॉलीवूडमध्ये कायमच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच हे दोघंही लेक आराध्यासह बाहेरगावी फिरायला गेले होते. नुकतेच हे तिघंही ट्रिपवरून मुंबईत परतले. या तिघांचा एअरपोर्टवरील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

‘विरल भयानी’ या पापाराझी इन्स्टाग्राम पेजवरून ऐश्वर्या-अभिषेक व आराध्याचा एअरपोर्टवरील व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये सर्वप्रथम मायलेकींच्या डॅशिंग लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

ऐश्वर्या नेहमीच आपल्या लाडक्या लेकीची विशेष काळजी घेताना दिसते. एअरपोर्टवर अभिषेक पुढे चालत आला आणि त्याच्या पाठोपाठ आराध्याचा हात पकडून ऐश्वर्याची एन्ट्री झाली. यावेळी मायलेकींचा स्वॅग चर्चेचा विषय ठरला. ऐश्वर्या व आराध्या या दोघींनी एअरपोर्ट लूकसाठी Twinning केल्याचं पाहायला मिळालं. मॅचिंग काळा कोट, सेम टू सेम कॅप याशिवाय दोघींनी सारखीच हेअरस्टाइल केली होती. पापाराझींना आनंदाने ‘हाय, हॅलो’ करून या दोघी गाडीच्या दिशेने रवाना झाल्या. आराध्या सुद्धा यावेळी खूपच आनंदी दिसत होती.

अभिषेक या दोघींची आधीच कारजवळ वाट पाहत होता. सर्वप्रथम त्यांच्या आलिशान गाडीत आराध्या जाऊन बसली, यानंतर ऐश्वर्या सर्वांना ‘बाय’ म्हणत गाडीत बसली. मात्र, पत्नी आणि मुलगी दोघीही गाडीत बसेपर्यंत अभिषेक कारच्या डोअरजवळच उभा होता. गाडीचा डोअर बंद होईपर्यंत अभिषेकने वाट पाहिली आणि त्यानंतर तो पुढच्या सीटवर येऊन बसला.

अभिषेकच्या या ‘केअरिंग नेचर’ची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा होत असून, नेटकऱ्यांनी त्याचं भरभरून कौतुक केलं आहे. अभिषेकने यावेळी हुडी, त्यावर बेज रंगाचं जॅकेट, काळी ट्राउझर असा लूक केला होता. ऐश्वर्या, आराध्या आणि अभिषेक या तिघांनीही यावेळी ‘ब्लॅक कॅप्स’ घातल्याचं पाहायला मिळालं.

दरम्यान, ऐश्वर्या व अभिषेक यांच्या लग्नाला आता १८ वर्षे पूर्ण झाली आहेत. काही महिन्यांपूर्वी दोघांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र, आराध्याच्या शाळेतील स्नेहसंमेलन सोहळ्याला एकत्र उपस्थिती लावत ऐश्वर्या-अभिषेकने घटस्फोटांच्या चर्चांना पूर्णविराम दिला. त्यानंतर, दोघांनी अनेक कार्यक्रमांना एकत्र हजेरी लावली आणि एकत्र प्रवासही केला.