Aishwarya Rai Net Worth 900 Crore: बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन २८ वर्षांपासून सिनेइंडस्ट्रीत सक्रिय आहे. व्यावसायिक आयुष्याबरोबरच वैयक्तिक आयुष्यामुळेही ती चर्चेत असते. सध्या ऐश्वर्या राय तिच्या संपत्तीमुळे बातम्यांमध्ये आहे. ती सर्वात श्रीमंत अभिनेत्रींच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
ऐश्वर्या रायने १८ वर्षांपूर्वी अभिषेक बच्चनशी लग्न केलं. लग्नानंतरही तिने चित्रपटांमध्ये काम सुरूच ठेवलं. ऐश्वर्या राय चित्रपटांबरोबरच जाहिरातींमध्येही काम करते. ऐश्वर्याने चित्रपट करून खूप पैसा कमावला. ऐश्वर्याच्या संपत्तीचा आकडा नुकताच समोर आला आहे, त्यानुसार ती ९०० कोटी रुपयांची मालकीण झाली आहे. तसेच ती भारतातील दुसरी सर्वात श्रीमंत अभिनेत्री ठरली आहे.
ऐश्वर्या रायचे उत्पन्नाचे स्रोत
फोर्ब्सच्या माहितीनुसार, ऐश्वर्या रायची एकूण संपत्ती आता ९०० कोटी रुपये झाली आहे. ऐश्वर्या रायने पैशांची गुंतवणूक योग्य पद्धतीने केली आहे, त्यामुळे तिच्या संपत्तीत दरवर्षी वाढ होते. ऐश्वर्याच्या उत्पन्नाच्या स्त्रोतांबद्दल बोलायचे झाल्यास ती एका चित्रपटासाठी ५ ते १० कोटी रुपये आकारते. तसेच जाहिरातींमधून ती ६ ते ७ कोटी रुपये कमावते.
ऐश्वर्या रायची संपत्ती
ऐश्वर्याकडे अनेक आलिशान मालमत्ता आहेत. ती सध्या मुंबईतील वांद्रे येथे एका बंगल्यात राहते, ज्याची किंमत ५० कोटींपेक्षा जास्त आहे. तसेच, दुबईतील सँकच्युअरी फॉल्समधील जुमेराह गोल्फ इस्टेट्समध्ये तिचा एक आलिशान व्हिला देखील आहे, त्याची किंमतही कोट्यवधींमध्ये आहे.
ऐश्वर्या रायचे कार कलेक्शन
ऐश्वर्या राय बच्चनलाही लक्झरी गाड्यांची आवड आहे. तिच्याकडे ऑडी, रोल्स रॉयस फँटम, रोल्स रॉयस घोस्ट, मर्सिडीज सारख्या अनेक लक्झरी गाड्या आहेत ज्यांची किंमत कोट्यवधींमध्ये आहे. ऐश्वर्या राय बच्चनने गेल्या ७ वर्षात फक्त तीन चित्रपट केले आहेत, त्यापैकी एक २०१८ मध्ये ‘२.०’ आला होता. नंतर दुसरा २०२२ मध्ये आलेला ‘पोन्नियन सेल्वन’ होता. तर २०२३ मध्ये तिचा ‘पोन्नियन सेल्वन २’ सिनेमा आला होता.