Aishwarya Rai ex boyfriend was Shweta Bachchan’s Crush: अभिनेत्री ऐश्वर्या राय व सलमान खान यांचं अफेअर एकेकाळी खूप गाजलं होतं. ‘हम दिल दे चुके सनम’ची ही ऑनस्क्रीन जोडी खऱ्या आयुष्यात प्रेमात पडली होती. ऐश्वर्याने तर बरेचदा सलमान खानवरचं तिचं प्रेम जाहीरपणे व्यक्त केलं होतं. पण नंतर मात्र त्याचं ब्रेकअप झालं. काही वर्षांनी ऐश्वर्याने अभिषेक बच्चनशी लग्न केलं. अभिषेकच्या बहिणीला ऐश्वर्याचा एक्स बॉयफ्रेंड फार आवडायचा.

अमिताभ बच्चन यांची लाडकी लेक श्वेता बच्चनने स्वतःच याबाबत खुलासा केला होता. श्वेता बच्चन आई-वडिलांप्रमाणे अभिनय क्षेत्रात आली नाही. लाइमलाइटपासून दूर राहणाऱ्या श्वेताचे बॉलीवूडमध्ये खूप मित्र आहेत. ती तिच्या आई-वडिलांबरोबर चित्रपटाच्या सेटवर जायची जिथे अनेक स्टार्स तिचे मित्र झाले. ती बॉलीवूड पार्ट्यांमध्येही हजेरी लावत असते. याच श्वेताला एक बॉलीवूड अभिनेता खूप आवडायचा. तो तिचा क्रश होता व तो तिच्या वहिनीचा म्हणजेच ऐश्वर्याचा एक्स बॉयफ्रेंड आहे. सलमान खान श्वेताचा क्रश होता.

श्वेता बच्चनने एकदा करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये हजेरी लावली होती. या शोमध्ये तिने सलमान खानवर क्रश असल्याचं सांगितलं होतं. श्वेता म्हणाली होती की ती अनेकदा अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्याबरोबर शूटिंग सेटवर जायची, त्यामुळे सलमान तिला आवडू लागला.

श्वेता बच्चन सलमान खानबद्दल काय म्हणाली होती

करणने श्वेताला हॉटनेसनुसार काही अभिनेत्यांना रँक करण्यास सांगितलं होतं. याचं उत्तर देताना श्वेताने सर्वात आधी सलमान खानचं नाव घेतलं होतं. तिला सलमानचं इतकं वेड होतं की ती त्याची ‘मैंने प्यार किया’ मधील टोपी घालून झोपायची. ही टोपी श्वेतासाठी तिचा भाऊ अभिषेकने आणली होती.

श्वेता बच्चन हिचं लग्न उद्योगपती निखिल नंदा यांच्याशी झालंय. या जोडप्याला नव्या नवेली नंदा व अगस्त्य नंदा ही दोन अपत्ये आहेत. अगस्त्य चित्रपटांमध्ये काम करतोय, तर नव्या वडिलांप्रमाणे उद्योगात करिअर करतेय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ऐश्वर्या राय व सलमान खानबद्दल बोलायचं झाल्यास दोघेही दोन वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. पण हे नातं अत्यंत वाईट पद्धतीने संपलं. त्यानंतर ऐश्वर्या व अभिषेक बच्चन भेटले, दोघांनी काही काळ एकमेकांना डेट केल्यावर २००७ मध्ये लग्न केलं. या जोडप्याला आराध्या नावाची मुलगी आहे. तर, सलमान खानचं नाव बॉलीवूडमधील अनेक अभिनेत्रींबरोबर जोडलं गेलं, मात्र त्याने लग्न केलं नाही.