बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगणचा 'भोला' ३० मार्चला सर्वत्र प्रदर्शित झाला. भोलाबरोबरच 'दसरा' हा दाक्षिणात्य सिनेमाही चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार नानी मुख्य भूमिकेत आहे. 'भोला' व 'दसरा' या दोन्ही चित्रपटांच्या बॉक्स ऑफिस कमाईचे आकडे समोर आले आहेत. अजय देवगणचा 'भोला' प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असल्याचं चित्र आहे. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या दिवशी जवळपास दहा कोटींची कमाई केली आहे. तर दसरा चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर डंका वाजवला आहे. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या दिवशी तब्बल १७ कोटींचा गल्ला जमवला आहे. हेही वाचा>> Dasara film : अजयच्या ‘भोला’ पाठोपाठ आता नानीचा ‘दसरा’ चित्रपट झाला लीक; निर्मात्यांनी उचललं कठोर पाऊल प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी अजय देवगणच्या 'भोला'पेक्षा नानीचा 'दसरा' वरचढ ठरला आहे. बॉक्स ऑफिसवर 'भोला' व 'दसरा'मध्ये स्पर्धा होताना दिसणार आहे. अजय देवगण व नानीच्या चित्रपटांमध्ये बॉक्स ऑफिसवर तगडी टक्कर पाहायला मिळणार आहे. 'दसरा' चित्रपट दाक्षिणात्य सुपरस्टार नानी मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट तमिळ, कन्नड, मल्याळम व हिंदी अशा चार भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. तर 'भोला' चित्रपटात अजय देवगणसह तब्बू, अमला पौल हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.