Ajay Devgn’s Son Of Sardaar 2 Release Date postponed : ‘सैयारा’ चित्रपटाची सध्या बरीच चर्चा सुरू आहे. अहान पांडे व अनित पड्डा यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट काल १८ जुलै रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी तब्बल २१.२५ कोटी रुपयांची कमाई केली. अशातच आता या चित्रपटाची रेकॉर्ड ब्रेकिंग सुरुवात पाहता, अजय देवगणच्या ‘सन ऑफ सरदार २’ चित्रपटाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.

अजय देवगण व मृणाल ठाकूर यांची मुख्य भूमिका असलेला ‘सन ऑफ सरदार २’ हा चित्रपट यापूर्वी २५ जुलैला प्रदर्शित होणार होता. परंतु, नुकत्याच रिलीज झालेल्या ‘सैयारा’ चित्रपटाला मिळत असलेला प्रतिसाद पाहता, या चित्रपटाच्या निर्मात्यांनी प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे.

‘सन ऑफ सरदार २’ आता १ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. परंतु, तृप्ती डिमरी व सिद्धार्थ चतुर्वेदी यांचा ‘धडक २’ हा सिनेमासुद्धा १ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे आता बॉक्स ऑफिसवर या दोन चित्रपटांची टक्कर होणार आहे.

‘पीव्हीआर सिनेमा’च्या सोशल मीडिया पेजवरून काही वेळापूर्वीच ‘सन ऑफ सरदार २’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलली असल्याची माहिती देण्यात आली आहे. यावेळी त्यांनी ‘सन ऑफ सरदार २’ आता १ ऑगस्टला चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले आहे.

‘सन ऑफ सरदार २’चा पहिला भाग ‘सन ऑफ सरदार’ हा चित्रपट २०१२ साली प्रदर्शित झाला होता. त्यावेळी चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाल होता. ‘सॅकनिल्क’च्या वृत्तानुसार या चित्रपटाने तेव्हा बॉक्स ऑफिसवर भारतात एकूण १४१.८९ कोटी रुपये कमावले होते; तर पहिल्या दिवशी या चित्रपटाने १०.८१ कोटींची कमाई केलेली.

‘सैयारा’च्या पहिल्या दिवसाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचं झालं तर ‘सॅकनिल्क’च्या अहवालानुसार, या चित्रपटानं पहिल्या दिवशी २० कोटींची कमाई केली आहे. हे आकडे पुढे वाढण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जात आहे. तर पहिल्या आठवड्यात हा चित्रपट ७०-७५ हजार कोटींची कमाई सहज करेल, असं म्हटलं जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘सैयारा’ या चित्रपटातून अहान पांडे व अनित पड्डा बॉलीवूडमध्ये पदार्पण करीत आहे. दोघांचाही मुख्य भूमिका असलेला हा पहिलाच चित्रपट आहे. अहान पांडे हा बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडेचा चुलतभाऊ आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या बॉलीवूडमधील पदार्पणाबद्दल चर्चा सुरू होती.