बॉलिवूडचा खरा अॅक्शन स्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अजय देवगणने आत्तापर्यंत अनेक सुरपहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. गेल्यावर्षी त्याचे भोला, चाणक्य सारखे चित्रपट प्रदर्शित झाले. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटांनी चांगली कमाई केली होती. आता लवकरच त्याचा ‘शैतान’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मध्यंतरी याचा एक छोटासा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता नुकताच या चित्रपटाचा थरकाप उडवणारा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.

काळी जादू, वशीकरण अशा भयानक गोष्टीवर या चित्रपटाचं कथानक बेतलेलं आहे. याच चित्रपटाच्या ट्रेलर लॉंच दरम्यान अजय देवगणने त्याला आलेल्या अशाच काही भयानक अनुभवांबद्दल शेअर केलं आहे. अजय म्हणाला, “गेल्या बऱ्याच महिन्यांपासून मला एक हॉरर चित्रपट करायचा होता. याआधी मी ‘भूत’सारखा चित्रपट केला आहे. मला हा प्रकार खूप आवडतो कारण आजही बऱ्याच ठिकाणी काळी जादूसारखी गोष्ट अस्तित्त्वात आहे.”

Watch waiter’s priceless reaction to sketch artist's sweet surprise
न मिळालेल्या कौतुकाची पोचपावती! कलाकारानं हॉटेलच्या बिलवर रेखाटलं वेटरचं सुरेख चित्र; चेहऱ्यावर उमटलं सुंदर हास्य, Video Viral
Virat Kohli's video goes viral
IPL 2024: गौतम गंभीरच्या गळाभेटीवर विराटने सोडले मौन; चाहत्यांना म्हणाला, ‘तुमचा मसाला संपला म्हणून तुम्ही…’, पाहा VIDEO
youth dies
मस्करी जीवावर बेतली; कम्प्रेसरच्या सहाय्याने मित्राच्या गुदद्वारात हवा भरली, तरूणाचा दुर्दैवी मृत्यू
A layer of Water Hyacinth due to pollution in the river saved the life of a young woman who committed suicide
तरुणीने आत्महत्या केली, पण जलपर्णीने वाचवले; ग्रामस्थांनी वेळेत मदत केल्याने तरुणी सुखरूप

आणखी वाचा : ‘चेन्नई एक्सप्रेस’मध्ये शाहरुखशी दोन हाथ करणाऱ्या ‘थंगबली’कडे नव्हते ११ महीने काम; अभिनेता म्हणाला, “माझं आयुष्य…”

अशा अनैसर्गिक घटनांबद्दल बोलताना अजय म्हणाला, “मला असे भुताटकीचे बरेच अनुभव आले आहेत. आम्ही जेव्हा आऊटडोर शुटींगसाठी जायचो तेव्हा हे असे अनुभव आम्हाला बऱ्याचदा आले आहेत. त्यापैकी नेमकं किती खरं किती खोटं हे मला ठाऊक नाही. त्यापैकी काही घटना माझ्या लक्षातही आहेत. पण मी ज्यांना भेटलो आहे त्यांच्यापैकी अशी फार कमी लोक आहेत ज्यांचा या गोष्टीवर अजिबात विश्वास नाही.”

‘शैतान’मध्ये बॉलिवूडचे दोन दिग्गज अभिनेते अजय देवगण आणि आर. माधवन हे दोघे या प्रथमच एकत्र काम करत आहेत. ट्रेलरमध्ये आर. माधवनचं पात्र हे अजय देवगणवर चांगलंच भारी पडताना दिसत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन विकास बेहल यांनी केलं आहे. ‘शैतान’ हा २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या गुजराती चित्रपट ‘वश’ चित्रपटाचा रिमेक असल्याचे सांगण्यात येत आहे. हा चित्रपट ८ मार्च २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अजय देवगणबरोबर आर माधवन, साऊथची सुपरस्टार ज्योतिका यांच्याही प्रमुख भूमिका आहे.