शाहरुख खान व दीपिका पदूकोणचा ‘चेन्नई एक्सप्रेस’ हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या आवडत्या चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला. शाहरुखच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत ‘चेन्नई एक्सप्रेस’ हा चित्रपट अव्वल ठरतो. याच चित्रपटातील दीपिकाच्या पात्राबरोबरच इतरही दाक्षिणात्य कलाकार पाहायला मिळाले. ‘बाहुबली’मध्ये ‘कट्टपा’ही भूमिका साकारणाऱ्या सत्यराज यांची खूप चर्चा झाली. याबरोबरच आणखी एक पात्र प्रेक्षकांच्या स्मरणात राहिलं ते म्हणजे थंगबली.

‘थंगबली’ हे धमाल पात्र साकारणारा अभिनेता निकितिन धीर हा सध्या चर्चेत आहे. निकितिन नंतर सलमान खानच्या ‘अंतिम’ आणि अक्षय कुमारच्या ‘सूर्यवंशी’सारख्या चित्रपटातही झळकला. परंतु ‘चेन्नई एक्सप्रेस’नंतर आलेला अनुभव त्याने नुकताच शेअर केला आहे. या चित्रपटानंतर आपल्याला भरपुर चित्रपटांच्या ऑफर्स येतील असा समज निकितिन धीरचा होता, पण तसं काहीच झालं नाही. ‘चेन्नई एक्सप्रेस’च्या यशानंतर तब्बल ११ महीने निकितिनकडे काहीच काम नसल्याचा खुलासा त्याने केला.

indian man killed in canada
कॅनडामध्ये भारतीय तरुणाची हत्या? कारमध्ये आढळला मृतदेह, पोलीस म्हणाले…
garvit and nandini suicide instagram
‘लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या युट्यूबर जोडप्याची अवघ्या पंचवीशीतच आत्महत्या
Hardik Malinga Pushing Video Viral
MI vs SRH : हार्दिक पंड्याने लसिथ मलिंगाला ढकलल्याने चाहते संतापले, VIDEO होतोय व्हायरल
Dolly chaiwala in malvids video viral
Video : बिल गेट्सला चहा दिल्यानंतर मालदीवमध्ये फिरतोय डॉली चायवाला! मात्र नेटकरी झालेत नाराज…

आणखी वाचा : गौतमी देशपांडेने नव्या व्हिडीओमधून सादर केलं लतादीदींचे ‘हे’ गाणं; चाहते म्हणाले, “तुझं प्रोफेशन…”

‘टाइम्स ऑफ इंडिया’शी संवाद साधताना निकितिन म्हणाला, “चेन्नई एक्सप्रेसनंतर माझं आयुष्यच पालटून जाईल असं मला वाटलं होतं. मला ठाऊक होतं की हा चित्रपट शाहरुख खान आणि दीपिका पदूकोण यांच्या करिअरमधला एक जबरदस्त हीट चित्रपट ठरणार आहे. हा चित्रपट इतका गाजला की रातोरात माझी लोकप्रियता वाढली. लोक मला ओळखू लागले. इतक्या वर्षांच्या मेहनतीचं फळ मिळालं असं मला वाटलं. पण तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की चित्रपट प्रदर्शित झाल्यावर जवळपास ११ महीने माझ्याकडे काहीच काम नव्हते.”

पुढे निकितिन म्हणाला, “एखाद्या चित्रपटाची ऑफर येईल या आशेवर मी होतो. हिंदीत नाही तर किमान दाक्षिणात्य चित्रपटांची ऑफर तरी मला मिळेल असा माझा अंदाज होता, पण मला कुठेच काम मिळत नव्हतं. लोक मला ‘थंगबली’ म्हणूनच ओळखत होते. तेव्हा मला माझ्या जवळच्या लोकांनी रीयालिटि शोमध्ये भाग घ्यायचा सल्ला दिला. त्यामुळे मी ‘खतरों के खिलाडी’ हा रीयालिटि शो केला अन् प्रेक्षकांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला. त्यानंतर मी पुन्हा चित्रपटांकडे वळायचा निर्णय घेतला अन् मला काम मिळायला सुरुवात झाली.”

निकितिन धीर हा अभिनेते पंकज धीर यांचा मुलगा आहे. पंकज यांनी बीआर चोप्रा यांच्या ‘महाभारत’मध्ये कर्णाची भूमिका निभावली होती. निकितिन ने आत्तापर्यंत ‘जोधा अकबर’, ‘हाऊसफूल ३’, ‘सर्कस’, ‘शेरशाह’सारख्या चित्रपटात काम केलं आहे. याबरोबरच त्याने काही दाक्षिणात्य चित्रपटातही काम केलं आहे. नुकतंच निकितिन हा रोहित शेट्टीच्या ‘इंडियन पोलिस फोर्स’ या वेबसीरिजमध्ये झळकला.