बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमार हा त्याच्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखला जातो. नुकताच अक्षयचा ‘मिशन राणीगंज’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला फारसं यश मिळत नसल्याचं दिसत आहे. अक्षय कुमार त्याच्या चित्रपटातून कायम सामाजिक किंवा राजकीय मुद्यांना हात घालतो अन् यामुळे त्याला बऱ्याचदा ट्रोलर्सना सामोरं जावं लागतं.

सोशल मीडियावर अक्षयला ‘मोदी भक्त’ म्हणूनही काही लोक खिजवतात. नुकतंच त्याने ‘इंडिया टूडे’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये या ट्रोलिंगवर तसेच राजकारणावर भाष्य केलं आहे. या मुलाखतीमध्ये अक्षयला राजकारणात जायची संधी मिळाली तर जाणार का असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला खिलाडी कुमारने अगदी चपखल असं उत्तर दिलं आहे.

narendra modi, PM Narendra Modi,
हुकमी ‘नॅरेटिव्ह’ने यंदा मोदींना हुलकावणी दिली आहे का?
BJP tukde-tukde gang Kanhaiya Kumar interview delhi lok sabha election
“मी तुकडे-तुकडे गँगचा असेन तर मोदी मला अटक का करत नाहीत?”; कन्हैयाचं भाजपाला आव्हान
Sudhir Mungantiwar reacts on social media trolling about controversial statement against congress
“काँग्रेसविरोधात मी असाच बोलत राहणार,” सोशल मीडियावरील ट्रोलिंगला सुधीर मुनगंटीवार यांचे प्रत्युत्तर; म्हणाले, “भाषणाचा अर्धवट व्हिडिओ…”
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र

आणखी वाचा : ‘मोदी भक्त’ म्हणून खिल्ली उडवणाऱ्या ट्रॉलर्सना अक्षय कुमारचं सडेतोड उत्तर; म्हणाला, “ते फक्त…”

अक्षय म्हणाला, “मी सध्या तरी राजकारणात प्रवेश करू इच्छित नाही. पुढे भविष्यात काय होईल याबद्दल मी सांगू शकत नाही, पण अद्याप तरी माझा राजकारणात प्रवेश करायचा विचार नाही. सध्या मी जे चित्रपट करतोय ते फार महत्त्वाचे आहेत. परमेश्वराच्या कृपेने मला एक असा मंच मिळाला आहे ज्याच्या माध्यमातून मी आपल्या लोकांना देशात घडलेल्या या घटनांबद्दल सांगू शकतो.”

याआधीसुद्धा अक्षयला राजकारणात जाण्याबद्दल विचारलेलं तेव्हा पीटीआयशी संवाद साधतांना अक्षय म्हणाला, “मी एक अभिनेता म्हणून फार खुश आहे. ज्या मुद्द्यांवर भाष्य करायचं आहे ते मी माझ्या चित्रपटातून करतो. मी १५० हून अधिक चित्रपटांची निर्मिती केली आहे. मी व्यावसायिक चित्रपटही करतो ज्यात कधी कधी सामाजिक समस्यांवर भाष्य केलेलं असतं.” अक्षयचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘मिशन राणीगंज’ हा सत्यघटनेवर आधारीत आहे.