Akshay Kumar Katrina Kaif Movie : अक्षय कुमार आणि कतरिना कैफ या जोडीचा २०१० मध्ये आलेला चित्रपट म्हणजे तीस मार खान. हा एक विनोदी चित्रपट होता. गाण्यांमुळे चित्रपटाची प्रदर्शनाआधीच खूप चर्चा रंगली होती. पण या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी चांगली कामगिरी केली नाही आणि तो फ्लॉप ठरला.
फराह खानने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. फराह खान ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका आणि चित्रपट दिग्दर्शकासुद्धा आहे. फराहने आजवर अनेक उत्तम चित्रपट दिले आहेत. यामध्ये ‘ओम शांती ओम’, ‘मैं हूं ना’ आणि इतर अनेक हिट चित्रपटांचा समावेश आहे. मात्र तिने २०१० मध्ये आलेल्या ‘तीस मार खान’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता.
उत्तम कलाकार आणि जबरदस्त प्रमोशन असूनही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता. या फ्लॉप चित्रपटाबद्दल फराहने नुकतीच एक आठवण शेअर केली आहे. तिने सांगितलं की, जेव्हा हा चित्रपटाच्या अपयशाबद्दल बॉलीवूडमधल्या अनेक लोकांनी आनंद साजरा केला.
जॅकी भगनानी आणि रकुल प्रीत सिंह यांच्या घरी केलेल्या एका व्लॉग व्हिडीओमधून तिने ‘तीस मार खान’ चित्रपटाबद्दल आठवण व्यक्त केली. जॅकी भगनानीने ‘बेलबॉटम’ या चित्रपटाच्या यशामुळे टीका सहन करावी लागल्याचे सांगितलं. यावरून फराहला तिच्या २०१० साली आलेल्या ‘तीस मार खान’ या फ्लॉप चित्रपटाची आठवण आली.
याबद्दल ती म्हणाली, “आपल्या इंडस्ट्रीत लोकांना दुसऱ्याच्या यशापेक्षा अपयशाचा जास्त आनंद वाटतो. मला आठवतं, जेव्हा ‘तीस मार खान’ प्रदर्शित झाला आणि बॉक्स ऑफिसवर चांगला चालला नाही, तेव्हा बॉलीवूडमध्ये आनंदी वातावरण होते. मी ज्या लोकांबरोबर काम केलं होतं, तेही म्हणत होते, ‘आता आली ना लाईनवर’. पण आजच्या Gen Z पिढीला ‘तीस मार खान’ हा चित्रपट आवडतो. त्यांना माझे इतर चित्रपट महत्त्वाचे वाटत नाहीत.”
दरम्यान, फराह खान एक नृत्यदिग्दर्शिका, दिग्दर्शिका असण्याबरोबरच आता एक कंटेंट क्रिएटरदेखील आहे. तिचे यूट्यूबवर चॅनेल आहे. या चॅनेलवर ती कुकिंगचे व्हिडीओ शेअर करत असते. सेलिब्रिटींच्या घरी भेट देत आणि त्यांच्याशी गप्पांची झलक या व्हिडीओमधून पाहायला मिळते. अलीकडेच फराह जॅकी भगनानी आणि रकुल प्रीत यांच्या घरी गेली होती.