अभिनेता अक्षय कुमारचे ‘सम्राट पृथ्वीराज’, ‘रक्षाबंधन’ यांसारखे काही चित्रपट एकापाठोपाठ एक प्रदर्शित झाले. त्याचे अलिकडेच प्रदर्शित झालेले हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर मात्र सुपरफ्लॉप ठरले. सुपरफ्लॉप चित्रपटांनंतर अक्षय कुमारच्या नव्या चित्रपटाने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. खिलाडी कुमारचा ‘राम सेतु’ येत्या दिवाळीला सिनेरसिकांच्या भेटीला येणार आहे. सध्या अक्षय या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. अक्षय नेहमीच त्याच्या कृतीने सर्वांचे लक्ष वेढून घेत असतो. यावेळीही त्याने असेच काहीसे केले आहे.

हेही वाचा : आलिया पाठोपाठ कंगनाही साकारणार देहविक्री करणाऱ्या स्त्रीची भूमिका; बायोपिकबद्दल पहिल्यांदाच केला खुलासा

नुकतेच मुंबईतील एका सिनेमागृहात या चित्रपटातील ‘राम सेतु अँथम’ हे एक गाणे लॉंच करण्यात आले. या कार्यक्रमाच्या वेळी अक्षय कुमारच्या एका कृतीने तेथे उपस्थित सर्वजण आश्चर्यचकित झाले. अक्षय त्याच्या चित्रपटातील श्रीरामावर आधारित गाणे गाण्यासाठी स्टेजवर जाताना पायातील शूज काढले आणि तो स्टेजवर गेला. त्याच्या या कृतीने त्याने सर्वांचीच मनं जिंकली.

आणखी वाचा : ‘ढोंगी’ म्हणत नेटकऱ्यांनी घेतली अक्षय कुमारची शाळा, व्हायरल व्हिडीओमुळे करावा लागतोय ट्रोलिंगचा सामना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान अक्षयच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक शर्मा यांनी केलं आहे. रामायणापासून प्रेरित होऊन या चित्रपटाची कथा तयार करण्यात आली आहे. अभिनेत्री नुसरत भरुचाही चित्रपटामध्ये महत्त्वाच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. येत्या २५ ऑक्टोबरला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दाखल होईल. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. त्यालाही प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. या चित्रपटासाठी सगळेजण खूप उत्सुक असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रदर्शनानंतर काय कमाल करतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.