अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर आज गोंडस मुलीचे आई-बाबा झाले. बॉलिवूडच्या या बहुचर्चित जोडीने आपल्या पहिल्या बाळाचं स्वागत केल्यानंतर सर्व सेलिब्रेटी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचं अभिनंदन करताना दिसत आहेत. आलिया भट्टच्या सोशल मीडिया पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत तिचं अभिनंदन केलं आहेत. अशात अभिनेता आणि समीक्षक कमाल आर खानचं ट्वीट सोशल मीडियावर चर्चेत आहे. कमाल आर खानने आलिया आणि रणबीरचं अभिनंदन करताना असं काही ट्वीट केलं आहे की त्याची जोरदार चर्चा होताना दिसतेय.

आपल्या ट्वीटमधून नेहमीच बॉलिवूड सेलिब्रेटींची खिल्ली उडवणाऱ्या केआरकेने यावेळी आपल्याच खास अंदाजात ट्वीट केलं आहे. आपल्या ट्वीटमध्ये त्याने लिहिलं, “७ महिन्यांमध्ये एका सुंदर मुलीचे आई-बाबा झाल्याबद्दल आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचं अभिनंदन!” केआरकेच्या या ट्वीटवर युजर्स वेगवेगळ्या कमेंट्स करताना दिसत आहेत.

आणखी वाचा-Video: आलिया भट्टला मुलगी झाल्याचे कळताच राखी सावंतने वाटली मिठाई, म्हणाली…

केआरकेच्या या ट्विटला रिप्लाय देताना एका युजरने लिहिलं, “अशाप्रकारे अभिनंदन कोण करतं?”, तर दुसऱ्याने लिहिलं, “याचा रिव्ह्यू कधी येईल भाऊ”. त्याचप्रमाणे आणखी एकाने, ‘सात महिने लिहिणे आवश्यक होतं’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्याचप्रमाणे इतर युजर्सही कमेंट्स करताना दिसत आहेत. रणबीर आलियाच्या लग्नापासून आतापर्यंतचा कालावधीही युजर्स मोजताना दिसत आहेत.

आणखी वाचा-मुलीच्या जन्मानंतर अलियाच्या पोस्टवर दीपिका- कतरिनाच्या प्रतिक्रिया, कमेंटने वेधलं लक्ष

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान आलिया भट्ट आणि रणबीर कपूर या वर्षी १४ एप्रिल रोजी विवाहबद्ध झाले आणि आलियाने लग्नानंतर लगेचच तिच्या प्रेग्नन्सीची एक पोस्ट शेअर केली होती. आलिया भट्टच्या कामाबद्दल बोलायचं तर लवकरच ती करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय ती ‘जी ले जरा’मुळेही चर्चेत आहे. तसेच आलिया ‘हार्ट ऑफ स्टोन’ या चित्रपटातून हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.