बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट नेहमी चर्चेत आहे. अलीकडेच आलियाने ‘मेट गाला-२०२३’ मध्ये पदार्पण केले होते. मेट गालामधील आलियाच्या लूकने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. आता आलियाचा नवा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत आलिया फोटोग्राफरच्या आईकडे त्याची तक्रार करताना दिसत आहे.

हेही वाचा- ‘द केरला स्टोरी’ वादाच्या भोवऱ्यात; तमिळनाडूतील मल्टीप्लेक्स संघटनांनी चित्रपटाविरोधात घेतला मोठा निर्णय

आलिया भट्टला पाहताच फोटोग्राफर तिचे फोटो घेण्यासाठी पुढे येताना व्हिडीओत दिसत आहे. एवढ्यात आलियाची नजर एका फोटोग्राफरकडे जाते. आलिया हसत त्याच्याजवळ जाते. आलिया त्या फोटोग्राफरच्या आईकडे त्याची तक्रार करताना दिसत आहे. तुमचा मुलगा मला खूप त्रास देतो, पण चांगला मुलगा आहे. असं म्हणत आलियाने फोटोग्राफरची गोड तक्रार केली आहे. एवढंच नाही तर आलिया त्याच्या आईबरोबर फोटोही काढते आणि त्यांना सांभाळून जाण्यासही सांगते. आलियाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. फोटोग्राफर आणि त्याच्या आईबरोबर दाखवलेल्या आपुलकीने चाहते आलियाचे कौतुक करत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आलिया भट्टच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच करण जोहरच्या चित्रपटात रणवीर सिंगसोबत पुन्हा एकदा दिसणार आहे. ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ नावाचा हा रोमँटिक कॉमेडी चित्रपट असेल. धर्मेंद्र, शबाना आझमी आणि जया बच्चन यांसारखे दिग्गज कलाकारही या चित्रपटात दिसणार आहेत. याशिवाय आलियाही हॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. आलिया ‘हार्ट ऑफ स्टोन’मध्ये दिसणार आहे.