दीड महिन्यापूर्वी बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टच्या घरी छोटी परी म्हणजेच आलिया रणबीरची मुलगी ‘राहा’चं आगमन झालं. तेव्हापासून आलिया मातृत्वाचा आनंद घेत आहे. आई झाल्यानंतर अनेकदा ती तिचे फोटो शेअर करत असते. तसंच त्या फोटोंमधून ती मातृत्व कशी एन्जॉय करतेय हे चाहत्यांशी शेअर करत असते. नुकताच तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
‘राहा’च्या जन्मानंतर कपूर कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. तिला भेटण्यासाठी अनेकजण येत आहेत. राहाची झलक पाहण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत. राहासाठी एका व्यक्तीने बेडसेट भेटवस्तू म्हणून दिला आहे. याबाबतची तिने पोस्ट शेअर केली आहे. बेडसेटचा फोटो टाकत तिने लिहले आहे. “सर्वात सुंदर बेडसेटबद्दल खूप खूप धन्यवाद रिहा मावशी,” असा तिने कॅप्शन दिला आहे.
प्रभासच्या लव्ह लाईफबद्दल अखेर अभिनेता रामचरणने केला खुलासा; व्हिडीओ व्हायरल
आलियाच्या गरोदरपणात ती बाळाच्या जन्मानंतर वर्षभर तरी काम करणार नाही, ती वर्षभर कामापासून ब्रेक घेणार अशा चर्चा रंगल्या होत्या. पण आलियाने वेगळाच विचार केला आहे. राहाच्या जन्माच्या तीन महिन्यानंतरच ती नव्या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे.
-
actress
आलिया फरहान अख्तरच्या आगामी चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार होती. गरोदरपणा नंतर ते थेट याच चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करेल असंही बोललं गेलं. मात्र आता ती फरहान अख्तर च्या नव्हे तर संजय लीला भन्साळी यांच्या ‘बैजू बावरा’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे.