अभिनेत्री आलिया भट्ट तिच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे. या चित्रपटात आलिया अभिनेता रणवीर सिंहबरोबर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सध्या दोघेही ‘रॉकी और रानी…’च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. अलीकडेच दोघांनी कोलकाता येथील एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमाचा व्हिडीओ आलियाने तिच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हेही वाचा : “नग्नता, आक्षेपार्ह सीन्सचा भडीमार…”, ओटीटी माध्यमांवर अन्नू कपूर यांची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाले, “पैसा कुठून…”

कोलकाता येथे संपन्न होणाऱ्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’च्या प्रमोशन कार्यक्रमासाठी आलियाने बंगाली भाषेत काही संवाद पाठ केले होते. याची संपूर्ण झलक अभिनेत्रीने व्हिडीओमध्ये शेअर केली आहे. मात्र, मुख्य कार्यक्रमाला पोहोचल्यावर मोठ्या मेहनतीने पाठ केलेले बंगाली भाषेतील संवाद आलिया भट्ट विसरून गेली.

हेही वाचा : “बायकोचे दागिने विकले, डोक्यावर ९० लाखांचं कर्ज…; केदार शिंदेंनी दिला कटू आठवणींना उजाळा, म्हणाले…

आलियाला “नमस्कार कोलकाता…” म्हटल्यावर बंगाली भाषेतील पुढचा एकही संवाद आठवत नव्हता. यानंतर रणवीर तिला म्हणतो, “अगं किती गोड…सगळी मेहनत घेऊन ऐन परीक्षेत तू सगळं काही विसरलीस. आता माझ्याकडे पाहू नकोस मलाच काही येत नाही.” रणवीरने चेष्टा केल्यावर आलियाला अचानक बंगाली भाषेतील काही संवाद आठवले आणि तिने बंगाली बोलून चाहत्यांना आश्चर्यचकीत केले. यानंतर अभिनेत्याने तिचे कौतुक केले.

हेही वाचा : “आर्थिक मदत, वैद्यकीय खर्च अन्…”, ज्येष्ठ रंगकर्मींसाठी निवेदिता आणि अशोक सराफ यांचा पुढाकार, सुरु केला नवा उपक्रम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आलिया याविषयी स्पष्टीकरण देत म्हणाली, “मी सकाळपासून या भाषेचा सराव करत होते आणि तुमच्यासमोर आल्यावर गोंधळून गेले. तुम्हा सर्वांना प्रेमाने अभिवादन करण्याचा माझा उद्देश होता.” दरम्यान, आलिया-रणवीरचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट २८ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.