आलिया भट्ट व रणबीर कपूर सध्या आपल्या होणाऱ्या बाळासाठी प्लॅनिंग करत आहेत. आलियाच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रमही नुकताच पार पडला. या कार्यक्रमाला मोजक्याच मंडळींनी हजेरी लावली होती. यादरम्यानचे काही फोटोदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाले. व्हायरल फोटोंमध्ये आलियाचा प्रेग्नेंसी ग्लो दिसून आला. आलियाने सध्या कामामधून ब्रेक घेतला आहे. त्याचबरोबरीने रणबीरलाही खऱ्या आयुष्यामध्ये आदर्श वडील बनायचं आहे. म्हणूनच आता त्याने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

आणखी वाचा – Photos : प्राजक्ता माळीचं सुंदर घर पाहिलंत का? अभिनेत्रीनेच दाखवली झलक, पाहा काही खास फोटो

२०२२ हे वर्ष आलिया-रणबीरसाठी लकी ठरलं आहे. वर्षाच्या सुरुवातीला लग्न, त्यानंतर सुपरहिट चित्रपट अन् आता नव्या पाहुण्याची चाहुल. या सेलिब्रिटी कपलच्या आयुष्याला आता नव्याने सुरुवात होणार आहे. म्हणूनच रणबीर आपलं बाळ घरी येण्यापूर्वी संदीप रेड्डी दिग्दर्शित ‘एनिमल’ चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण करणार आहे.

ईटाइम्सच्या वृत्तानुसार, ‘एनिमल’ चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर रणबीर आपल्या कामामधून काही काळासाठी ब्रेक घेणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणानंतर तो कोणताच चित्रपट साइन करणार नाही. कारण रणबीरला आपल्या होणाऱ्या बाळाला अधिकाधिक वेळ द्यायचा आहे.

आणखी वाचा – Video : पत्नीला पाहताच मिठी मारली अन् रडू लागले अमिताभ बच्चन, पण नेमकं काय घडलं? व्हिडीओ व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या महिन्यामध्येच ‘एनिमल’च्या चित्रीकरणाला सुरुवात होईल. तसेच रणबीर लवकरात लवकर चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. आलिया-रणबीरचा १४ एप्रिलला विवाहसोहळा पार पडला. त्यानंतर जून महिन्यामध्येच आपण गरोदर असल्याचं आलियाने सोशल मीडियाद्वारे सांगितलं. आता हे दोघं आई-वडील म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत.