आलिया भट्ट बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. आलिया सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. व्हिडीओ, फोटो पोस्ट करीत ती चाहत्यांना अपडेट देत असते. दरम्यान, आलिया आता एका नव्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर तिचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोवरून अनेकांनी तिला ट्रोल केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १४ ऑक्टोबर रोजी NMACC येथे १४१ व्या IOC सत्राचे उद्घाटन केले. मुंबईत पहिल्यांदाच आयओसी अधिवेशन घेण्यात आले होते. या सत्रात अनेक बॉलीवूड कलाकार सहभागी झाले होते. शाहरुख खान, दीपिका पदुकोण, आलिया भट्ट व रणबीर कपूर यांनी या सत्राला हजेरी लावली होती. या सत्रादरम्यानचा आलिया भट्टचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फोटोमध्ये दीपिका, शाहरुख खान व रणबीर सिंग पंतप्रधान नरेंद्र मोंदीचं भाषण ऐकताना दिसत आहेत; तर आलिया चक्क झोपलेली दिसत आहे.
या फोटोवर अनेकांनी कमेंट करीत आलियाला ट्रोल केले आहे. एकाने कमेंट करीत लिहिले “आलिया इतकी कंटाळली आहे की, ती डुलकी घेताना दिसत आहे.” आणखी एका युजरने कमेंट केली, “आलिया तिथे झोपायला गेली आहे.” याशिवाय अनेकांनी रणबीर कपूरला दीपिका पदुकोणबरोबरच्या नात्यावरूनही ट्रोल केलं आहे.
हेही वाचा- मणीरत्नम पुन्हा ‘दिल से’ व ‘बॉम्बे’सारखे चित्रपट बनवू शकतील का? पत्नी सुहासिनी यांनी दिलं उत्तर
आलियाच्या कामाबाबत बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच तिचा ‘रॉकी और राणी की प्रेम’ कहाणी चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात तिच्याबरोबर रणवीर सिंह मुख्य भूमिकेत होता. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने चांगली कमाई केली होती. तर रणबीर कपूर त्याच्या ‘‘अॅनिमल’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. १ डिसेंबरला त्याचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.