Alia Bhatt shared an adorable reel with Ranbir Kapoor: सध्या बॉलीवूडमधील अनेक जोडप्यांची कायम चर्चा होताना दिसते. त्यामध्ये कियारा अडवाणी व सिद्धार्थ मल्होत्रा, कतरिना कैफ व विकी कौशल, प्रियांका चोप्रा व निक जोनास, दीपिका पादुकोण व रणवीर सिंह, तसेच रणबीर कपूर आणि आलिया भट्ट या जोडप्यांचा समावेश आहे.

रणबीर कपूर व आलिया भट्ट हे त्यांच्या चित्रपटांमुळे तर चर्चेत असतातच. त्याबरोबरच त्यांच्या खासगी आयुष्यामुळेदेखील ते चर्चेत असतात. सोशल मीडियावरील त्यांचे फोटो, व्हिडीओ लक्ष वेधून घेत असतात.

आलिया भट्टने शेअर केला व्हिडीओ

सध्या आलिया आणि रणबीर हे सुट्यांसाठी लंडनला गेले आहेत. आता आलियाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती वेगवेगळ्या आऊटफिटमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना आलियाने ट्विर्ल गर्ल, अशी कॅप्शन दिली आहे. या व्हिडीओमध्ये तिने रणबीरचा हात धरल्याचे पाहायला मिळाले. मात्र, रणबीरचा चेहरा या व्हिडीओमध्ये दिसत नाही. तसेच, हा व्हिडीओ शेअर करताना तिने ‘द लोकल ट्रेन’मधील ‘दिल मेरे’ गाणे लावले आहे. तिच्या या व्हिडीओवर अनेक चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी ती खूप सुंदर दिसत असल्याचे म्हटले आहे.

एका नेटकऱ्याने लिहिले, “इतकं क्यूट कोणी कसं असू शकतं?”, दुसऱ्या एक नेटकऱ्याने लिहिले, “आता नवीन ट्रेंड होणार आहे”, आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “आलिया तुझे असे क्यूट व्हिडीओ, फोटो पोस्ट करीत राहा.”

“जेव्हा तू अशा क्यूट पोस्ट शेअर करतेस, तेव्हा आमचा दिवस छान जातो”, “आलिया खूप सुंदर दिसत आहेस”, “आलियाने आता एक नवी ट्रेंडची सुरुवात केली आहे”, “आलिया सेलेब्रिटी आहे, आपल्यासारख्या सामान्य लोकांसारखी वागते”, “खूप सुंदर” अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहे.

रणबीर आणि आलिया यांच्याबद्दल बोलायचे, तर त्यांनी २०२२ एप्रिल मध्ये लग्नगाठ बांधली होती. २०२२ नोव्हेंबर त्यांना मुलगी झाली. तिचे नाव राहा असे आहे. राहा अनेकदा तिच्या आई-वडिलांबरोबर सार्वजनिक ठिकाणी दिसते. रणबीर आणि आलिया यांच्याबरोबर त्यांच्या लेकीचीदेखील मोठी चर्चा रंगताना दिसते. राहाचादेखील चाहतावर्ग आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या कलाकार जोडप्याच्या कामाबद्दल बोलायचे, तर ते लवकरच संजय लीला भन्साळी यांच्या ‘लव्ह अँड वॉर’मध्ये दिसणार आहे. त्यांच्याबरोबर विकी कौशलदेखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. याबरोबरच, आलिया अल्फा या चित्रपटातदेखील दिसणार आहे. तर, रणबीर कपूर रामायण या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.