अभिनेत्री कंगना रणौत सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियाद्वारे व्यक्त होणं ही कंगनाची खासियत आहे. आताही ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे एक व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ शेअर करत असताना तिने काही वर्षांपूर्वी तिच्यावर करण्यात आलेल्या आरोपांबाबत भाष्य केलं. तिच्या या वादग्रस्त वक्तव्याचीच सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे.

आणखी वाचा – प्राजक्ता माळीला फक्त पाहण्यासाठी पुण्याहून मुंबईला आलेली ‘ती’ खास व्यक्ती कोण? अभिनेत्रीनेच पोस्ट शेअर करत केला खुलासा

कंगनाने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे म्हटलं की, “२०० वर्षांपूर्वी महिलांना चेटकीण म्हणत जिवंत जाळलं जायचं. मलाही आधी चेटकीण म्हटलं जायचं. पण याचा मी स्वतःवर परिणाम करून घेतला नाही. मी तर खरी चेटकीण आहे.” कंगनाची ही पोस्ट चर्चेत असताना तिने आणखी एक पोस्ट शेअर केली.

त्यामध्ये तिने म्हटलं की, ” २०१६मध्ये एका वृत्तपत्रकाच्या संपादकाने म्हटलं होतं की यश मिळवण्यासाठी मी काळी जादू करत आहे. माझ्या मासिक पाळीमधून होणारा रक्तस्त्राव लाडूमध्ये मी मिक्स केला आणि ते लाडू दिवाळी गिफ्ट म्हणून इतरांना दिले.” कंगनाच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“ते दिवस खूप मजेशीर होते. चित्रपटसृष्टीमधील कोणाचाचा पाठिंबा नसताना, कोणत्याच चित्रपट कंपनीशी ओळख नसताना तसेच एकही बॉयफ्रेंड नसून मी टॉपची अभिनेत्री होते हे कोणी पाहिलं नाही. ही फक्त काळी जादू आहे असं सगळ्यांनी म्हटलं.” कंगनावर करण्यात आलेले हे आरोप वाचून अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.