ब्रिटीश आणि पाकिस्तानी अभिनेता अली खानने बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तो शाहरुख खानबरोबर ‘डॉन २’ चित्रपटातही झळकला होता. अलीने शाहरुखबरोबरच्या शूटिंगचा अनुभव शेअर केला आहे. तसेच तो शूटिंगवेळी शाहरुखच्या एका डायलॉगमुळे कसा चिडला होता, याबदद्लही त्याने सांगितलं.

Video: “तुम्ही हिंदुत्वाचा डंका वाजवता अन्…” अमृता फडणवीसांच्या ‘त्या’ व्हिडीओवरून नेटकऱ्यांचा उपमुख्यमंत्र्यांना सवाल!

अली खानने अलीकडेच पाकिस्तानी कलाकार नादिर अलीच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली, यात त्याने अनेक खुलासे केले. तो शाहरुख खानबरोबरचा अनुभव शेअर करताना म्हणाला, “शाहरुख खान शूटिंग करताना अचानक ९० च्या दशकात गेल्याचं पाहून मला खूप विचित्र वाटलं होतं. आम्ही बर्लिनमध्ये डॉन २ चे शूटिंग करत होतो. लंडनमध्ये रा-वनचे शूटिंग केल्यानंतर शाहरुख तिथे आला होता. परदेशाप्रमाणेच भारतातही प्रत्येक अभिनेत्याला कॉलशीट दिली जाते. शाहरुखला नंबर वन कॉल देण्यात आला होता. नोव्हेंबरच्या कडाक्याच्या थंडीत मी सेटवर हजर होतो. मग वॉकीटॉकीवर घोषणा झाली, नंबर १ आला आहे. पण तो सेटवर आला नव्हता, तर काही अंतरावर बनवलेल्या बेसवर आला होता. शाहरुख तेव्हाच आला होता आणि त्याला जेवण करायचं होतं, पण त्याआधी रिहर्सल करायची होती. माझा सीन शाहरुखसोबत होता, त्यामुळं मी माझे डायलॉग पाठ करून गेलो होतो. शाहरुख एका शूटवरून आला होता, त्यामुळे तो तेव्हा स्क्रिप्ट वाचत होता. डॉनचा दिग्दर्शक फरहान अख्तर, मी आणि शाहरुख बाकीच्या टीमबरोबर जमलो. तेव्हा शाहरुख म्हणाला, मला भूक लागली आहे, म्हणून हा सीन लवकर संपवावा लागेल. नंतर त्याने मला मिठी मारली, मी कसा आहे हे विचारलं आणि आम्ही सर्वजण बसलो.”

अजय देवगणचं प्रॉडक्शन अन् क्रश काजोलबरोबर किसिंग सीन; अभिनेता शूटिंगचा अनुभव सांगत म्हणाला, “त्या दिवशी सेटवर…”

पुढे अली म्हणाला, “आम्ही सीनचं शूटिंग सुरू केल्यावर शाहरुखने स्क्रिप्टमध्ये नसलेला एक डायलॉग म्हटला आणि फरहानने मान हलवली. सीन संपल्यावर फरहान थांबला आणि शाहरुखला म्हणाला, ‘शाह, मी तुला एक विनंती करू का? तु शेवटचा डायलॉग जोडला तो काढ आणि स्क्रिप्टमध्ये आहे तसं बोल’. यावर शाहरुख म्हणाला, ‘अरे, डॉन कोण आहे? तो शाहरुख खान आहे ना? जनतेला शाहरुख खान पाहायचं आहे. काळजी करू नकोस.’ मग मी फरहानला बाजूला घेतलं आणि म्हटलं, आताच तर तुझा नंबर बन आला आहे, एडिट तुझ्या हातात आहे, त्याला जे करायचं ते करू दे. जेव्हा आम्ही पुन्हा तो सीन शूट केला, तेव्हा शाहरुखने तो डायलॉग वेगळ्या पद्धतीने म्हटला. मग मी फरहानकडे पाहिलं आणि इशारा केला, फरहान याला सांग जरा, हा तर क..क..किरण करतोय. आपण कोणत्या शाळेत आलोय. एकतर आपण त्या ९० च्या दशकातील शाळेत खेळतोय किंवा आजच्या मॉडर्न युगात. ही ओव्हरअॅक्टिंग का?” असं आपण फरहानला म्हटल्याचं अलीने सांगितलं.

दरम्यान, “चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मला कळलं की तो शाहरुख खान का आहे. त्याला त्याचे प्रेक्षक माहीत आहे. त्याने वर्षानुवर्षे जी प्रतिमा निर्माण केली आहे, तीच प्रेक्षकांना हवी आहे आणि ती मिळाली नाही तर त्यांना त्यांची फसवणूक झाल्यासारखं वाटेल. शाहरुख खूप हुशार आहे,” असं अली म्हणाला.