बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान याचा आज ५७वा वाढदिवस आहे. अफलातून अभिनयाने प्रेक्षकांना भूरळ घालणाऱ्या शाहरुखचा चाहता वर्ग मोठा आहे. किंग खानचे केवळ भारतातच नाही तर जगभरात चाहते आहेत. ‘कभी खुशी कभी गम’, ‘मोहबते’, ‘कल हो ना हो’, ‘रईस’ यासारखे एका पेक्षा एक सुपरहिट चित्रपट देऊन अभिनयाची जादू त्याने प्रेक्षकांवर पाडली.

शाहरुखच्या वाढदिवशी जगभरातील चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे. अमेरिकन पॉर्नस्टार किंद्रा लस्टने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शाहरुखला खास पोस्ट शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत. किंद्रा हॉलिवूड तसेच अडल्ट फिल्म इंडस्ट्रीमध्ये पॉर्न स्टार म्हणून प्रसिद्ध आहे. किंद्राने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शाहरुखचा आगामी चित्रपट पठानचे पोस्टर शेअर केलं आहे. पोस्टर शेअर करत तिने ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा शाहरुख’ असं कॅप्शन दिलं आहे. या पोस्टमध्ये तिने शाहरुखला टॅगही केलं आहे.

हेही वाचा >> “सहा महिन्यानंतर अजून कोणावर बलात्काराची केस…”, साजिद खानवर आरोप करणाऱ्या शर्लिन चोप्रावर राखीची गंभीर टीका

हेही वाचा >> “७५व्या वर्षी अशोक सराफ यांची ऊर्जा…”, ‘व्हॅक्युम क्लिनर’ नाटक पाहिल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत

किंद्राने पोस्ट करत शाहरुखला शुभेच्छा दिल्यामुळे चाहतेही आश्चर्यचकित झाले आहेत. या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. एकाने कमेंट करत “शाहरुख खानचा जलवा”, असं म्हटलं आहे. तर दुसऱ्याने “भाई का स्वॅग अलग है”, अशी कमेंट केली आहे.

हेही वाचा >> ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चनच्या लग्नात जान्हवी कपूरने हाताची नस कापली अन्…; नेमकं काय घडलं होतं?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शाहरुख तब्बल नऊ वर्षांनंतर चाहत्यांसाठी चित्रपटांची मेजवानी घेऊन येत आहे. पठाण, जवान या चित्रपटांतील त्याचा लूक व्हायरलही झाला आहे. सलमान खानच्या टायगर ३मध्ये तो पहिल्यांदाच केमिओ करताना दिसणार आहे.