विश्वसुंदरी आणि लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिचा आज वाढदिवस आहे. नव्वदच्या दशकांत ऐश्वर्याने तिच्या सौंदर्याने अनेकांना भूरळ पाडली. तिच्या सौंदर्याचे केवळ देशातच नाही तर जगभरात लाखो चाहते आहेत. ऐश्वर्याने २००७ साली बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनसह लग्नगाठ बांधत तिच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली. त्यांना आराध्या ही मुलगीही आहे.

ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चनच्या लग्नातील एक किस्सा बऱ्याच जणांना ठाऊक नाही. ऐश्वर्या-अभिषेकचं लग्न होऊ नये अशी मॉडेल आणि डान्सर असलेल्या जान्हवी कपूरची इच्छा होती. “माझा नवरा चोरला” असं म्हणत तिने ऐश्वर्यावर आरोप केला होता. ऐश्वर्या आणि अभिषेक यांचं लग्न होत असलेल्या जुहूमधील प्रतीक्षा या हॉलबाहेर तिने हाताची नस कापत आत्महत्या करण्याचा प्रयत्नही केला होता.

chaturang article, mazhi maitrin chaturang
माझी मैत्रीण : जिवाभावाची…
salman khan firing accused Sagar pal father reaction
सलमान खानच्या घरावर गोळ्या झाडणाऱ्या आरोपीच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “तो खूप…”
Ulta-Chashma
उलटा चष्मा: लोक‘शाही’ लग्न 
Salman Khan was the bartender at Riddhima Kapoor wedding
रणबीर कपूरच्या बहिणीच्या लग्नात बारटेंडर होता सलमान खान; ऋषी कपूर त्याला म्हणाले होते, “तू निघ तिथून…”

हेही वाचा >> “सहा महिन्यानंतर अजून कोणावर बलात्काराची केस…”, साजिद खानवर आरोप करणाऱ्या शर्लिन चोप्रावर राखीची गंभीर टीका

‘दस’ या अभिषेक बच्चनच्या चित्रपटातील ‘दस बहाणे कर के ले गया दिल’ या गाण्यात जान्हवी बॅकग्राऊन्ड डान्सर होती. अभिषेक बच्चन आणि ती एकमेकांना दोन वर्षांपासून डेट करत असल्याचं तिचं म्हणणं होतं. अभिषेक मला जुहूमध्ये भेटायला यायचा, असंही ती म्हणाली होती. माझ्या केसांत अभिषेकने कुंकूही भरल्याचं जान्हवीने प्रसारमाध्यमांना सांगितलं होतं.  

हेही वाचा >> “७५व्या वर्षी अशोक सराफ यांची ऊर्जा…”, ‘व्हॅक्युम क्लिनर’ नाटक पाहिल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत

अभिषेकने मित्रपरिवारासमोर पारंपरिक पद्धतीने तिच्याशी लग्न केलं असल्याचा दावाही जान्हवीने केला होता. परंतु, मित्रांची ओळख लपविण्यासाठी फोटो घेण्यास मी नकार दिला असल्याचं ती म्हणाली होती. “जर तुमचं एखाद्यावर प्रेम असेल, तर त्यासाठी पुराव्यांची गरज लागत नाही”, असंही ती म्हणाली होती. जान्हवीने अभिषेक बच्चन विरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा प्रयत्नही केला होता. परंतु, आत्महत्येचा प्रयत्न केल्यामुळे जान्हवीलाच अटक करुन तिला दहा हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता.