scorecardresearch

लिपस्टिक का लावलीस? अमिताभ बच्चनवर ऋषिकेश मुखर्जी भडकले तेव्हा…

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगद्वारे ‘आनंद’ चित्रपटादरम्यानचा किस्सा सांगितला.

लिपस्टिक का लावलीस? अमिताभ बच्चनवर ऋषिकेश मुखर्जी भडकले तेव्हा…
अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगद्वारे 'आनंद' चित्रपटादरम्यानचा किस्सा सांगितला. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगद्वारे 'आनंद' चित्रपटादरम्यानचा किस्सा सांगितला.

‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमादरम्यान अनेक चाहत्यांना बिग बी अमिताभ बच्चन यांना भेटण्याची संधी मिळते. अमिताभ यांना प्रत्यक्षात पाहून त्यांचं तोंडभरुन कौतुक करतात. आताही या शोच्या सेटवर एका महिलेने अमिताभ यांच्या ओठांचं कौतुक केलं. दरम्यान त्यांनी ‘आनंद’ या चित्रपटाचा ब्लॉगद्वारे एक किस्सा सांगितला.

आणखी वाचा – ‘माझी तुझी रेशीमगाठ’ फेम अभिनेत्रीची झाली सर्जरी, रुग्णालयातील फोटो शेअर करत मानले डॉक्टरांचे आभार; म्हणते “माझ्या नवऱ्यानेही…”

१९७१मध्ये ‘आनंद’ चित्रपट प्रदर्शित झाला. ऋषिकेश मुखर्जी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं होतं. तर राजेश खन्ना चित्रपटात मुख्य भूमिकेत होते. अमिताभ यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये म्हटलं की, “एका महिलेने ‘केबीसी’मध्ये माझ्या ओठांवर कमेंट केली. हा ‘आनंद’ चित्रपटामधील एक फोटो आहे. या फोटोमागेही एक किस्सा आहे. माझ्या ओठांचा रंगच लालसर आहे.”

“‘आनंद’च्या चित्रीकरणादरम्यान जेव्हा मी कॅमेऱ्यासमोर आलो तेव्हा दिग्दर्शक व डिओपी मला ओरडू लागले. म्हणाले की, “तू ओठांवर लिपस्टिक का लावलीस? तुला काय वाटतं तू कोण आहेस? ती लिपस्टिक आधी पुसून ये.”

आणखी वाचा – ‘पावनखिंड’च्या यशानंतर अजय पुरकर साकारणार तानाजी मालुसरेंची भूमिका; मराठीतील ऐतिहासिक चित्रपट ‘सुभेदार’ची चर्चा

यावर लिपस्टिक लावली नसल्याचं अमिताभ यांनी दिग्दर्शक व डिओपीला सांगितलं. मात्र त्यांनी या गोष्टीवर विश्वास ठेवला नाही. पुन्हा अमिताभ यांना दोघंही ओरडले. मेकअपमनला त्यांचे ओठ पुसण्यास सांगितले. त्यानेही प्रयत्न केले. पण अमिताभ यांच्या ओठांचा रंगच नैसर्गिक असल्याचं मेकअपमनने दिग्दर्शकाला सांगितलं. आजही अमिताभ यांच्या हा किस्सा आठवणीत आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-12-2022 at 16:29 IST

संबंधित बातम्या