अमिताभ बच्चन आणि जया बच्चन १९७१ मधील ‘गुड्डी’ चित्रपटाच्या सेटवर पहिल्यांदा भेटले होते. त्यांच्या लग्नाला ५० हून अधिक वर्षे झाली आहेत. पण जया यांच्या आधी अमिताभ बच्चन यांच्या आयुष्यात एक महिला होती. सेलिब्रिटी बायोग्राफर हनीफ झवेरी यांनी एका मुलाखतीत यासंदर्भात खुलासा केला आहे.

अमिताभ बच्चन यांची पहिली गर्लफ्रेंड कोण होती आणि त्यांचं ब्रेकअप का झालं होतं? तेही झवेरी यांनी सांगितलं. अमिताभ बच्चन मुंबईला जाण्यापूर्वी दोघे प्रेमात होते, पण त्यांचा पहिला चित्रपट ‘सात हिंदुस्तानी’ प्रदर्शित होण्यापूर्वीच त्यांचे ब्रेकअप झाले.

मेरी सहेली या युट्यूब चॅनलशी बोलताना हनीफ म्हणाले की, अमिताभ बच्चन माया नावाच्या महिलेच्या प्रेमात होते. दोघांची प्रेमकहाणी कोलकात्यात सुरू झाली. त्यावेळी माया महिन्याला सुमारे २५०-३०० रुपये कमवत असे. “ती त्यावेळी ब्रिटिश एअरवेजमध्ये काम करत होती. अमिताभ बच्चन तिच्यावर खूप प्रेम करायचे आणि तिचंही त्यांच्यावर खूप प्रेम होतं,” असं हनीफ यांनी सांगितलं.

माया अमिताभ यांना भेटायला यायची

“कोलकात्यातील नोकरीनंतर अमिताभ बच्चन चित्रपटांमध्ये करिअर करण्यासाठी मुंबईला आले. इथे ते सुरुवातीला जुहू येथील एका बंगल्यात राहत होते. तो बंगला त्यांची आई तेजी बच्चनच्या मैत्रिणीचा होता. तिथे माया त्यांना वारंवार भेटायला यायची. आईची मैत्रीण तिथेच राहत असल्याने मायाबद्दल आईला कळेल अशी भीती अमिताभ बच्चन यांना होती, त्यामुळे त्यांनी घर बदलायचं ठरवलं,” असं हनीफ म्हणाले.

अमिताभ त्यांचा पहिला चित्रपट ‘सात हिंदुस्तानी’ मध्ये काम करत होते. या सिनेमात मेहमूदचे भाऊ अन्वर अली होते. “अमिताभ यांनी अन्वरला त्यांच्या भीतीबद्दल सांगितलं. मग अन्वरने त्यांना घरी राहू दिलं. पुढे अन्वरने मेहमूदकडून एक अपार्टमेंट घेतलं होतं आणि अमिताभ काही काळ या घरात राहिले होते,” असं हनीफ म्हणाले.

सर्वांसमोर अमिताभवर चिडायची माया

“अमिताभ आणि माया काही काळ एकत्र होते आणि कदाचित त्यांचे लग्नही झाले असते पण त्यावेळी अमिताभ करिअरमध्ये स्थिरावले नव्हते. त्या काळी अमिताभ खूप शांत होते आणि माया खूपच हुशार होती. कधीकधी, अमिताभ बच्चन कोणाबरोबर बसले आहेत याची पर्वा न करता वाट्टेल तसं बोलायची. कधी कधी तर सर्वांसमोर ओरडायची. अन्वर अली आणि अमिताभच्या इतर सर्व मित्रांना हे आवडायचं नाही आणि अमिताभ बच्चन मायाच्या अशा वागण्याला घाबरायचे,” असं हनीफ म्हणाले.

हनीफ यांनी अमिताभ व त्यांच्या गर्लफ्रेंडबद्दल अन्वरशी काय बोलणं झालं होतं, ते सांगितलं. “अन्वरने मला सांगितलं होतं की जेव्हा ते गोव्यात ‘सात हिंदुस्तानी’चे शूटिंग करत होते, तेव्हा त्याने अमिताभ यांना मायाशी ब्रेकअप करायला सांगितलं. माया बच्चन कुटुंबात रुळणार नाही. तसेच अमिताभ यांनी फिल्म इंडस्ट्रीत करिअर केल्यास दोघांमधील समस्या वाढतील. अमिताभ यांनाही या नात्यात काहीतरी कमी आहे, असं वाटत होतं. नंतर हळुहळु अमिताभ यांनी स्वतःला मायापासून दूर केलं आणि नंतर ते वेगळे झाले,” असं हनीफ म्हणाले.

अमिताभ मायाचे ब्रेकअप

हनीफ यांनी अमिताभ व त्यांच्या गर्लफ्रेंडबद्दल अन्वरशी काय बोलणं झालं होतं, ते सांगितलं. “अन्वरने मला सांगितलं होतं की जेव्हा ते गोव्यात ‘सात हिंदुस्तानी’चे शूटिंग करत होते, तेव्हा त्याने अमिताभ यांना मायाशी ब्रेकअप करायला सांगितलं. माया बच्चन कुटुंबात फिट बसणार नाही. तसेच अमिताभ यांनी फिल्म इंडस्ट्रीत करिअर केल्यास दोघांमधील समस्या वाढतील. अमिताभ यांनाही या नात्यात काहीतरी कमी आहे, असं वाटत होतं. नंतर हळुहळु अमिताभ यांनी स्वतःला मायापासून दूर केलं आणि नंतर ते वेगळे झाले,” असं हनीफ म्हणाले.