महानायक अमिताभ बच्चन यांनी त्यांचा एक बंगला आपल्या मुलीला भेट म्हणून दिला आहे. बिग बींनी जुहूमधील आलिशान बंगला मुलगी श्वेता बच्चनच्या नावे केला आहे. नुकतीच याबाबत माहिती समोर आली आहे. या बंगल्याची किंमत कोट्यवधी रुपये आहे. अमिताभ बच्चन यांच्याजवळ मुंबईत तीन आलिशान बंगले आहे, त्यापैकीच एक त्यांनी मुलीला दिला आहे.

अमिताभ बच्चन आणि त्यांची पत्नी जया बच्चन यांनी त्यांची मुलगी श्वेता नंदा हिला मुंबईतील जुहू येथील ‘प्रतिक्षा’ हा बंगला भेट म्हणून दिला आहे. विठ्ठलनगर को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीमधील हा बंगला ७७४ चौरस मीटर आणि ८९०.४७ चौरस मीटरच्या दोन भूखंडांमध्ये पसरलेला आहे. याची एकत्र किंमत अंदाजे ५०.६३ कोटी रुपये आहे.

“मी आधी मॅडम म्हणायचो, पण आता…”, अमिताभ बच्चन पत्नी जया बच्चनना ‘या’ नावाने मारतात हाक

८ नोव्हेंबर रोजी दोन्ही भूखंडांच्या कागदपत्रांवर सही करण्यात आली आणि नोंदणीसाठी ५०.६५ लाख रुपये मुद्रांक शुल्क भरण्यात आले आहे. यासंदर्भात ‘इंडिया टुडे’ने वृत्त दिलं आहे. जुहूमधील हा बंगला आता श्वेता बच्चनच्या नावावर झाला आहे. श्वेता बच्चन नंदा एक उत्तम लेखिका आहे व उद्योजक आहे. तिने ‘पॅराडाईज टॉवर्स’ ही बेस्ट सेलिंग कादंबरी लिहिली आहे. तिला नव्या नवेली नंदा व अगस्त्य नंदा ही दोन अपत्ये आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमिताभ बच्चन त्यांच्या करिअरच्या सुरुवातीला कुटुंबासह अनेक वर्षे ‘प्रतिक्षा’मध्ये राहत होते. शिवाय त्यांच्याकडे जुहूमध्य ‘जलसा’ आणि ‘जनक’ असे दोन बंगले आहेत. सध्या ते कुटुंबासह ‘जलसा’ बंगल्यात राहतात.