वयाची सत्तरी ओलांडली तरी बिग बी अमिताभ बच्चन आजही तितक्याच जोमाने कलाक्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करत आहेत. बिग बी यांचे काही चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत. त्यातीलच एक चित्रपट म्हणजे ‘प्रोजेक्ट के’. सध्या या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू आहे. मध्यंतरी याच चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अमिताभ यांच्याबरोबर एक विचित्र घटना घडली. हैदराबादमध्ये चित्रपटाचं चित्रीकरण सुरू असताना त्यांना दुखापत झाली आहे.

अमिताभ यांनी त्यांच्या ब्लॉगद्वारे याबाबत माहिती दिली. त्यांच्या बरगड्याना दुखापत झाल्याचं स्पष्ट झालं, त्यानंतर डॉक्टरांनीसुद्धा त्यांना काही काळ पूर्ण विश्रांतीची गरज असल्याचं सांगितलं होतं. त्याप्रमाणेच बिग बी सध्या विश्रांती घेत आहे. दरम्यान त्यांनी केलेली एक पोस्ट चांगलीच चर्चेत आहे, या पोस्टमधून त्यांच्यात केवढा उत्साह आहे याची आपल्याला प्रचिती येईल.

आणखी वाचा : सेलेना गोमेझने रचला इतिहास; ४०० मिलियन फॉलोअर्सचा आकडा पार करणारी ठरली पहिली महिला

बिग बी यांनी काळा डिझायनर कुर्ता आणि पायजमा या वेशभुषेतील एका फॅशन शोच्या रॅम्पवरचा स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. याबरोबरच बिग बी पोस्टमध्ये लिहितात, “माझ्या तब्येतीसाठी तुम्ही केलेल्या प्रार्थनांसाठी आणि शुभेच्छांसाठी धन्यवाद. मी बरा झालो आहे…लवकरच याच जोशात रॅम्पवर पुन्हा येईन अशी आशा करतो.” या लूकमध्ये बिग बी एकदम डॅशिंग दिसत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा फोटो पाहून त्यांचे चाहते चांगलेच खुश झाले आहेत. बिग बी हे लवकरच बरे होऊन कामाला लागणार आहेत ही बातमी त्यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची आहे. चाहत्यांनी त्यांच्या या फोटोवर कॉमेंट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. “तुम्हाळ काळा रंग सूट होतो” असं एका युझरने म्हंटलं आहे तर काही लोकांनी त्यांचा उत्साह आणि कामाप्रति असलेल्या निष्ठेची प्रशंसा केली आहे.