Amitabh Bachchan Sorry Post : बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. ते फक्त त्यांच्या चित्रपटांमुळेच नव्हेत तर त्यांच्या सोशल मीडिया पोस्टनेही चाहत्यांचे लक्ष वेधून घेतात. ८२ व्या वर्षीही ते त्यांच्या आयुष्याशी आणि कामाशी संबंधित अनेक अनुभव चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. त्यामुळेच त्यांच्या पोस्टवर चाहते लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करतात. पण अनेकदा अमिताभ बच्चन यांच्या पोस्ट पाहून चाहते गोंधळतात.
अमिताभ बच्चन फेसबुक व एक्सवर सातत्याने पोस्ट करत असतात. त्यांनी नुकत्याच काही पोस्ट केल्या आहेत. त्यांच्या पोस्टचा अर्थ न समजल्याने बिग बींचे चाहते गोंधळले आहेत आणि नेमकं तुम्हाला काय म्हणायचं आहे, असे प्रश्न विचारत आहेत. त्यांच्या पोस्ट नेमक्या काय आहेत ते जाणून घेऊयात.
अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवर दोन क्रिप्टिक पोस्ट केल्या आहेत. या पोस्टमध्ये, त्यांनी त्यांची चूक मान्य केली आहे आणि माफी देखील मागितली आहे, त्यांनी या पोस्ट कशाबद्दल केल्या हे चाहत्यांना समजलं नाही. त्यांच्या या दोन पोस्ट चांगल्याच व्हायरल झाल्या आहेत. त्यांनी माफी का मागितली असं चाहते कमेंट्स करून विचारत आहेत.
अमिताभ बच्चन यांच्या पोस्ट
अमिताभ बच्चन यांनी रविवारी फेसबुकवर दोन पोस्ट केल्या. पहिल्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं “कमी बोला, कमी लिहा आणि कमी भोगा.” मग दुसऱ्या पोस्टमध्ये ते म्हणाले, “मला वाटलं होतं तारखा चुकल्या होत्या, पण मला समजलं की मी चुकलो… सॉरी.” अमिताभ बच्चन यांनी अचानक अशा दोन पोस्ट केल्याने चाहत्यांना संभ्रमात टाकलं आहे.


चाहत्यांनी केल्या कमेंट्स
अमिताभ बच्चन यांच्या या पोस्ट पाहिल्यानंतर चाहते सोशल मीडियावर त्यांना पोस्टचा अर्थ व संदर्भ विचारत आहेत. एका युजरने लिहिलं की तारखा चुकीच्या असू शकतात, कारण कॅलेंडर कधीही जीवनातील वेदना दाखवत नाही. दुसऱ्या युजरने लिहिलं, “सर, तुम्ही विषय स्पष्ट न करता वाचकांना गोंधळात का टाकता.” तिसऱ्या युजरने लिहिलं, “काय झालं अमिताभ जी प्लीज सांगा.” बिग बींनी अद्याप कोणालाही उत्तर दिलेले नाही, तसेच या पोस्टचा संदर्भही सांगितला नाही, त्यामुळे पोस्ट नेमक्या कशाबद्दल आहेत हे अस्पष्ट आहे.
अमिताभ बच्चन यांच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ते सध्या ‘कौन बनेगा करोडपती’चा १७ वा सीझन होस्ट करत आहेत.