अभिनेत्री रेखा आणि अमिताभ बच्चन यांची जोडी पहिल्यांदा ४७ वर्षांपूर्वी म्हणजे १९७६ मध्ये ‘दो अनजाने’ चित्रपटातून एकत्र दिसली. तर १९८१ मध्ये प्रदर्शित झालेला ‘सिलसिला’ हा त्यांचा अखेरचा चित्रपट ठरला. या चित्रपटानंतर या दोघांनी कधीच एकत्र काम केलं नाही. पण आजही या जोडीचे असंख्य चाहते आहेत. या दोघांच्या पहिल्याच चित्रपटाच्या वेळी रेखा यांना अमिताभ बच्चन यांच्या रागाला सामोरं जावं लागलं होतं.

हेही वाचा- ‘अर्जून कपूर आणि मलायकाची जोडी म्हणजे..’; ‘त्या’ व्हिडिओवरून दोघे पुन्हा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर

‘लावारीस’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अमिताभ आणि रेखा यांच्यात खूप जवळीक निर्माण झाली होती. या चित्रपटात एक इराणी डान्सर काम करत होती आणि बिग बी या डान्सरच्या प्रेमात पडल्याची बातमी समोर आली. मग काय रेखाने आव देखा ना तव पाहिला, अमिताभ बच्चन यांच्यासोबत प्रश्नोत्तरे करण्यासाठी सेटवर पोहोचली. रेखाच्या या प्रश्नाने अमिताभ यांनाही इतका राग आला की त्यांनी तिच्यावर हात उचलला.

हेही वाचा- चुलत बहिणीबरोबरच दीपिका पदुकोणच्या वडिलांनी थाटला संसार, अभिनेत्रीच्या वडिलांचा मोठा खुलासा, म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमिताभ बच्चन यांच्या या वागण्याने रेखा खूप नाराज झाल्या होत्या. त्यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘सिलसिला’मध्ये काम करण्यास नकार दिला होता. रेखाच्या या निर्णयामुळे यश चोप्रा काळजीत पडले होते. मात्र, दिग्दर्शकाने कसेतरी रेखाला अमिताभ आणि जया बच्चन यांच्यासोबत काम करण्यास राजी केले. आजही लोकांना हा चित्रपट खूप आवडतो. रेखाने अमिताभसोबतचे तिचे आनंदी नाते अनेकदा स्वीकारले आहे, मात्र प्रत्येक वेळी बिग बींनी हे नाते नाकारले आहे.