अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे ‘कौन बनेगा करोडपती’ (Kaun Banega Crorepati) या रिअॅलिटी शोचे होस्ट आहेत. या शोचे १६ वे पर्व सध्या सुरू आहे. या लोकप्रिय शोमध्ये बिग बी स्पर्धकांशी विविध विषयांवर गप्पा मारतात. आता त्यांना स्पर्धक काजोल वेदने लग्नापूर्वी ते जया यांना कोणत्या नावाने हाक मारायचे, त्यांचा रोमान्स कसा सुरू झाला, दोघांपैकी कोणी आधी प्रपोज केलं याबाबत विचारलं. त्याची उत्तरं बिग बींनी दिली.

अभिनेत्री जया भादुरी या लग्नानंतर जया बच्चन झाल्या. या जोडप्याच्या लग्नाला ५१ वर्षे झाली आहेत. शोमधील स्पर्धक काजोल वेद बिझनेस अॅनालिस्ट आहे. तिच्या लग्नाला सहा महिने झाले आहेत. तिने अमिताभ बच्चन यांना विचारलं, “जया मॅडम, यांना तुम्ही लग्नाच्या आधीपासून ओळखता, त्यामुळे तुम्ही त्यांना लग्नाच्या आधी आणि नंतर कोणत्या नावाचे हाक मारायचे?” यावर बिग बींनी “मी त्यांना त्यांच्या नावानेच हाक मारायचो” असं उत्तर दिलं.

“माझं कुटुंब उद्ध्वस्त झालंय”, अमिताभ बच्चन यांच्याशी लग्न झाल्यावर जया यांच्या वडिलांनी व्याहींजवळ व्यक्त केलेल्या भावना

लग्नाआधी अमिताभ बच्चन त्यांना जयाजी म्हणायचे का, असंही काजोलने विचारलं. त्यावर बिग बींनी हे लग्नानंर म्हणायला सुरुवात केली असं सांगितलं कारण ते आपल्या पत्नीचा आदर करतात. त्यानतंर काजोलने विचारलं की दोघांपैकी आधी कोणी अप्रोच केलं होतं. त्यावर बिग बी म्हणाले, “असं काहीही नव्हतं. आमचा एक ग्रुप होता, सगळेच एकत्र भेटायचो आणि फिरायचो. आमचा चित्रपट होता, त्यात आम्ही एकत्र काम केलं होतं. त्या चित्रपटाचं नाव जंजीर होतं.”

जया बच्चन यांना ‘या’ नावाने हाक मारायच्या रेखा; एकाच इमारतीत राहायच्या दोघी, अमिताभ अन् रेखांची पहिली भेट…

‘जंजीर’ चित्रपटात अमिताभ बच्चन व जया भादुरी यांनी एकत्र काम केलं होतं. हा चित्रपट हिट झाल्यास काहीतरी वेगळं करायचं असं त्यांच्या ग्रुपने ठरवलं होतं. नंतर चित्रपट हिट झाल्यास लंडनला जायचं ठरलं होतं. ते म्हणाले की देवाच्या कृपेने चित्रपट हिट झाला आणि त्यांनी लंडनला जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी घरी आई-वडिलांना सांगितलं की चित्रपट चांगला चालला त्यामुळे सुट्टी घेऊन ते सगळे लंडनला जाणार आहेत.

अमिताभ, जया व रेखा लाँग ड्राइव्हवर जायचे एकत्र; ‘ते’ दोघेही पुढच्या सीटवर बसायचे अन् मागे…

यावेळी अमिताभ बच्चन यांचे दिवंगत वडील हरिवंशराय बच्चन यांनी एक अट घातली की जर जया त्यांच्याबरोबर लंडनला येणार असतील तर त्यांना तिकडे जाण्याआधी लग्न करावी लागेल. त्यानंतर जया व अमिताभ यांनी लग्न केलं होतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
amitabh bachchan jaya bhaduri wedding
अमिताभ बच्चन व जया भादुरी यांच्या लग्नातील काही क्षण (फोटो – सोशल मीडिया)

अमिताभ बच्चन व जया भादुरी यांचे लग्न लग्न ३ जून १९७३ रोजी झाले होते. त्यांचे लग्न खूपच साधेपणाने पार पडलं होतं. त्यांच्या लग्नात मोजकेच पाहुणे होते.