२०० कोटी मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोपी सुकेश चंद्रशेखर तिहार तुरुंगात आहे. या प्रकरणात गेल्या काही महिन्यांपासून अनेक खुलासे होत आहेत. अनेक बॉलिवूड अभिनेत्रींशी सुकेशचे प्रेमसंबंध असल्याचं उघड झालं होतं. त्याने महागडे गिफ्ट देऊन तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढलं होतं. यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिससह नोरा फतेहीचा समावेश असल्याची चर्चा होती.

आता सुकेश आणि जॅकलिनची ही प्रेमकहाणी मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. मध्यंतरी सुकेश स्वतः जॅकलिनसाठी चित्रपट काढणार असल्याची बातमी समोर आली होती, पण आता मात्र सुकेश नव्हे तर एक प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक सुकेश आणि जॅकलिनच्या या प्रेमकहाणीला रुपेरी पडद्यावर साकारणार आहे.

आणखी वाचा : “घुसखोरांना गोळ्या घातल्या जातील…” कंगना रणौतच्या घरातील अजब पाटीने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

दिग्दर्शक आनंद कुमार यांनी तिहार जेलच्या जेलरशी भेट घेतली असल्याची नवीन अपडेट समोर आली आहे. तिहार जेलचे जेलर दीपक शर्मा यांच्या म्हणण्यानुसार सुकेशच्या आयुष्याबाबत बऱ्याच लोकांच्या मनात कुतूहल आहे, आणि यासाठी आनंद कुमार यांनी माहिती गोळा करण्यासाठी तिहार जेलचा एक दौरा केला होता. दीपक शर्मा यांनी स्वतः आनंद कुमार यांच्याबरोबरचा एक फोटोदेखील सोशल मीडियावर शेअर केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘इ टाइम्स’च्या वृत्तानुसार आनंद कुमार सध्या या कथेशी संबंधीत माहिती गोळा करत आहेत. शिवाय या कथेवर काम करण्यासाठी त्यांनी दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ६ महिन्यांसाठी बुकिंग केलं आहे आणि इथेच थांबून काही लेखक या कथेवर काम करणार आहेत आणि लवकरात लवकर ही कथा पूर्ण करणार आहेत. यामध्ये कोणते कलाकार दिसणार आहेत याबरोबरच इतर काही माहिती अद्याप समोर आलेली नाही. हा चित्रपट २०२४ च्या अखेरीस किंवा २०२५ मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आनंद कुमार यांनी ‘जिला गाजियाबाद’, ‘देसी कट्टे’सारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे.