अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर हे मागच्या काही काळापासून एकमेकांना डेट करत आहेत, पण दोघांनी आतापर्यंत जाहीरपणे त्यांच्या नात्याची कबुली दिलेली नाही. अशातच अनन्या आणि सारा अली खान यांनी नुकतीच ‘कॉफी विथ करण’मध्ये हजेरी लावली. यावेळी करणने अनन्याला तिच्या रिलेशनशिप स्टेटसबद्दल विचारलं. यावर अनन्याने नात्याबद्दल स्पष्ट भाष्य केलं नाही, पण ती आदित्यबरोबर आहे असे सूचक इशारे देणारे विधान केले. यासाठी तिने आदित्यच्या चित्रपटाचं नाव घेतलं.

शस्त्रक्रियेदरम्यान हृदयविकाराचे चार झटके आल्याने प्रसिद्ध मॉडेलचा मृत्यू, अवघ्या २९ व्या वर्षी झालं निधन

करणने अनन्याला विचारलं की “तू कधी प्रेमात ‘गुमराह’ (हरवली) आहेस का?” इथे करणने उल्लेख केलेला ‘गुमराह’ शब्द आदित्य रॉय कपूरशी संबंधित आहे. कारण हे त्याच्या चित्रपटाचं नाव आहे. करणला उत्तर देताना अनन्या म्हणाली, “आशिकी अशीच होते.” दरम्यान, ‘आशिकी २’ या चित्रपटात आदित्य रॉय कपूरची मुख्य भूमिका होती. १० वर्षांपूर्वी आलेल्या या चित्रपटाने आदित्यला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली.

पुढे ती म्हणाली, “काही गोष्टी खासगी आणि खास आहेत आणि त्या तशाच ठेवल्या पाहिजेत. परंतु मला खरोखर माझ्या व्यावसायिक जीवनाबद्दल बोलायचे आहे कारण कोणीही याबद्दल बोलत नाही.” जेव्हा करणने पुन्हा अनन्याकडून उत्तर मिळविण्यासाठी तिला आदित्यबद्दल विचारलं तेव्हा ती म्हणाली की “आम्ही फक्त चांगले मित्र आहोत.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याच एपिसोडमध्ये जेव्हा सारानेही अनन्या व आदित्यच्या नात्याबद्दल त्याच्या ‘द नाइट मॅनेजर’ सीरिजचा उल्लेख करत इशारा दिला. शिवाय यापूर्वी अनेकदा आदित्य व अनन्या एकमेकांबरोबर परदेशात फिरायला जाताना दिसले आहेत. दोघेही अनेक महिन्यांपासून डेट करत आहेत, फक्त त्यांनी नातं अधिकृत केलेलं नाही.