बॉलीवूडचे ‘झकास’ अभिनेते अनिल कपूर यंदा ‘बिग बॉस ओटीटी’चा तिसरा सीझन होस्ट करणार आहेत. यापूर्वीचा सीझन सलमान खानने होस्ट केला होता. आता लवकरच सुरू होणाऱ्या तिसऱ्या सीझनसाठी भाईजानच्या जागी अनिल कपूर यांची वर्णी लागली आहे. नुकताच या शोच्या लाँचिंगचा कार्यक्रम पार पडला यावेळी अनिल कपूर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यादरम्यान त्यांनी उपस्थित प्रेक्षकांशी मराठी भाषेत संवाद साधून ‘बिग बॉस मराठी’बाबतही भाष्य केलं.

अनिल कपूर यांना अपेक्षेप्रमाणे सलमानच्या जागी त्यांना या शोमध्ये रिप्लेस करण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले, “आम्ही सगळे एकमेकांचे खूप चांगले मित्र आहोत. कधी एखाद्या कार्यक्रमातून मला रिप्लेस करण्यात येतं तर, कधी त्याला… या गोष्टी होत असतात. ‘रिप्लेस’ हा शब्द खूप चुकीचा असं मला वाटतं कारण, आजच्या घडीला प्रत्येकाकडे काम आहे आणि प्रत्येकाला कायम काम मिळत असतं. परंतु, अनेकदा एखाद्या कलाकाराकडे वेळ नसतो किंवा इतर काही काम असतात. मलाही अलीकडेच दोन चित्रपटांमधून रिप्लेस करण्यात आलं. मला यामागची कारण सांगायची नाहीत कारण, खरंच या सगळ्या गोष्टी होत राहतात आपण फक्त आपलं काम करायचं. आपलं काम नेहमी आपण प्रामाणिकपणे केलं की, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात.”

हेही वाचा : “आपण खरंच इतके दगडाच्या काळजाचे झालोत का?” वसई हत्या प्रकरणाचा व्हिडीओ पाहून अभिनेता संतापला, म्हणाला, “पोलिसांना…”

अनिल कपूर यांना मराठीतून संवाद साधण्याची विनंती केली असता सगळ्यात आधी ते ‘जय महाराष्ट्र’ म्हणाले. “सर्वांना माझा जय महाराष्ट्र! मराठीमध्ये रितेश देशमुख साहेब ‘बिग बॉस’च्या नव्या पर्वाचं होस्टिंग करत आहेत. त्यामुळे ‘बिग बॉस’ मराठीचा नवीन सीझन नक्की बघा. माझा तो खूप चांगला मित्र आहे आणि मला लहान भावासारखा आहे त्यामुळे तो शो सुद्धा नक्की पाहा असं अनिल कपूर यांनी यावेळी सांगितलं.”

हेही वाचा : Video : “अंगना में बाबा…”, गोविंदाच्या ३१ वर्षांपूर्वीच्या गाण्यावर वनिता खरातचा जबरदस्त डान्स! हटके लूकने वेधलं लक्ष

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘बिग बॉस ओटीटी’चं तिसरं पर्व २१ जूनपासून ‘जिओ सिनेमा’वर सुरू होणार आहे. प्रेक्षकांना रात्री ९ वाजता हा शो पाहता येईल. मागील दोन पर्व जिओ सिनेमावर मोफत होते. पण आता ‘बिग बॉस ओटीटी’चं तिसरं पर्व पाहण्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. व्हायरल वडापाव गर्ल चंद्रिका दीक्षितसह ‘कच्चा बादाम गर्ल’ म्हणजेच अंजली अरोरा ‘बिग बॉस ओटीटी’च्या या नव्या पर्वात सहभागी होणार असल्याचं बोललं जात आहे.