रणबीर कपूरचा बहुचर्चित चित्रपट ‘अॅनिमल’ १ डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला. संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित या चित्रपटात रणबीरचे हिंस्त्र रूप बघायला मिळत आहे. प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची क्रेझ बघायला मिळत आहे. ‘अॅनिमल’मध्ये रणबीरसह रश्मिका मंदाना, अनिल कपूर, बॉबी देओल, शक्ती कपूर, तृप्ती डिमरी हे कलाकारही प्रमुख भूमिकेत आहेत. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने जबरदस्त कमाई केली होती. आता चित्रपटाने भारतात कमाईत ५०० कोटींचा आकडा पार केला आहे.
हेही वाचा- आलिया भट्टच्या लेकीची एक-दोन नाही तर ‘एवढी’ आहेत टोपणं नावं; म्हणाली, “लॉलीपॉप…”
संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित ‘अॅनिमल’ चित्रपटाने १६व्या दिवशी एकूण १२.८कोटींचा व्यवसाय केला होता. आता या चित्रपटाने १७ व्या दिवशी १५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. ‘अॅनिमल’चे भारतात एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन ५१२ कोटींवर पोहोचले आहे. जगभरात या चित्रपटाने ८०० कोटीपेक्षा अधिकचा गल्ला जमवला आहे.
या वर्षी शाहरुख खानच्या ‘जवान’ या चित्रपटाने देशात सर्वाधिक कमाई करत अनेक रेकॉर्ड बनवले होते. ‘जवान’ने बॉक्स ऑफिसवर ६४०.२५ कोटींची कमाई केली होती. तर ‘पठाण’ने बॉक्स ऑफिसवर ५४३.९ कोटींचा व्यवसाय केला होता. सनी देओलच्या ‘गदर २’ ने ५२५.७ कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यानंतर आता ५१२ कोटीची कमाई करणारा ‘अॅनिमल’ हा या वर्षातील चौथा मोठा चित्रपट ठरला आहे.
हेही वाचा-
‘अॅनिमल’ चित्रपट बघण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहात गर्दी करताना दिसत आहेत. अनेक ठिकाणी चित्रपटगृहाबाहेर हाऊसफुल्लचे बोर्ड लागले आहेत. प्रदर्शनाअगोदरच ॲडव्हॉन्स बुकिंगमधून ‘अॅनिमल’ने मोठी कमाई केली होती. भारताबरोबरच परदेशातही चित्रपटाने जबरदस्त कमाई केली आहे. ‘अॅनिमल’ प्रदर्शित होऊन सतरा दिवस झाले आहेत. या सतरा दिवसांत चित्रपटाची कमाई दिवसेंदिवस वाढतच गेल्याचे दिसून येत आहे.