आमिर खान ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटातून चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर परतला. त्याने चित्रपटाचे जोरदार प्रमोशन देखील केले, परंतु बहिष्कारामुळे हा चित्रपट थिएटरमध्ये चांगली कामगिरी करू शकला नाही. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर प्रेक्षकांनी चित्रपटगृहाकडे पाठ फिरवली. सलग सुपरहीट चित्रपट देणाऱ्या आमिर खानच्या या चित्रपटाने पहिल्या वीकेंडला ५० कोटींचा गल्लाही जमवता आला नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यामागे बऱ्याच गोष्टी कारणीभूत आहेत, त्यापैकी सर्वात महत्त्वाची गोष्ट होती ती म्हणजे ‘बॉयकॉट’ ट्रेंड. आमिर खानच्या या चित्रपटाला बॉयकॉट ट्रेंडचा जबरदस्त फटका बसला. यातील कलाकारांच्या आधीच्या काही वक्तव्यामुळे किंवा कृतीमुळे प्रेक्षकांना या चित्रपटाकडे पाठ फिरवली. आता इतके दिवसांनी अभिनेते अनुपम खेर यांनी पुन्हा या चित्रपटाच्या अपयशावर भाष्य केलं आहे.

आणखी वाचा : “घाबरायचे कारण…” सलमान खानला मिळणाऱ्या धमक्यांबद्दल कंगना रणौतने मांडलं स्पष्ट मत

एएनआयशी संवाद साधताना अनुपम खेर म्हणाले, “लाल सिंग चड्ढा हा काही फार उत्तम चित्रपट नव्हता. जर तो खरंच इतका उत्कृष्ट चित्रपट असता तर तो कोणत्याही परिस्थितीत चाललाच असता. आमिरचा पिके चांगला चालला, हे सत्य तुम्ही स्वीकारायलाच हवं. मी बॉयकॉट ट्रेंडचं अजिबात समर्थन करत नाही, पण आपण कोणालाही थांबवू शकत नाही. जर तुमचा चित्रपट चांगला असेल तर तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचतोच. उत्तमोत्तम चित्रपट करूनच या बॉयकॉट ट्रेंडवर आपल्याला मात करावी लागणार आहे.”

आणखी वाचा : राजामौली यांना सिंधू संस्कृतीवर करायचा होता चित्रपट; पाकिस्तानने आडकाठी केल्याने स्वप्नं राहिलं अपूर्ण

आमिर खानचा ‘लाल सिंह चड्ढा’ हा चित्रपट ११ ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. ‘लाल सिंह चड्ढा’ हा चित्रपट सुमारे १८० कोटी खर्च करून तयार करण्यात आला होता. मात्र आमिर खानच्या एका जुन्या वक्तव्यामुळे हा चित्रपट वादात सापडला. याचा परिणाम चित्रपटाच्या कलेक्शनवर झाला. या चित्रपटाचे भारतातील कलेक्शन १०० कोटींचा आकडाही गाठू शकले नाही. या चित्रपटाने जवळपास ७० कोटींची कमाई केली होती.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anupam her speaks about aamir khan recent flop movie laal singh chaddha avn
First published on: 01-05-2023 at 12:46 IST