Anupam Kher’s Step Son Praises His Movie Tanvi The Great : अनुपम खेर बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेते आहेत. नुकताच त्यांचा ‘तन्वी द ग्रेट’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन स्वत: अनुपम यांनी केलं असून, त्यामध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिकासुद्धा साकारली आहे. या चित्रपटाबाबत सध्या प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळताना दिसत आहेत.

अनुपम खेर यांच्या चित्रपटाच्या प्रीमियरला त्यांची पत्नी किरण खेर यांनी हजेरी लावली होती. अशातच आता त्यांच्या सावत्र मुलानं सिकंदर खेर यानंही वडिलांच्या चित्रपटाला पाठिंबा दिला आहे. सिकंदरनं सोशल मीडियावर या चित्रपटासंदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे. ‘तन्वी द ग्रेट’ हा सिनेमा आज १८ जुलैला प्रदर्शित झाला आहे.

सिकंदरनं वडिलांचा चित्रपट पाहिल्यानंतर त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यानं या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर करीत म्हटलं, “मी तुम्हाला या चित्रपटासाठी काम करत असल्याच्या पहिल्या दिवसापासून पाहिलं आहे आणि माझ्या मते, यापूर्वी तुम्ही इतका वेळ कुठल्याही गोष्टीसाठी दिला नव्हता. खेरसाहेब तुम्ही एक अप्रतिम चित्रपट बनवला आहे”.

सिकंदर पुढे म्हणाला, “चित्रपट बघताना मी रडलो, हसलो; पण चित्रपट संपेपर्यंत माझ्या चेहऱ्यावर स्मित हास्य होतं. या चित्रपटासाठी तुमचं अभिनंदन आणि हा इतका चांगला चित्रपट बनवल्याबद्दल धन्यवाद. अशा चित्रपटांची जगाला खूप गरज आहे”.

सिकंदरबद्दल सांगायचं झालं, तर सिकंदर खेर हा अभिनेत्री किरण खेर यांचा मुलगा आहे. अनुपम खेर यांच्याशी लग्न करण्यापूर्वी त्यांचं गौतम बेरी यांच्याशी लग्न झालेलं. सिकंदर हा किरण व गौतम यांचा मुलगा आहे. लग्नाच्या सहा वर्षांनंतर किरण व गौतम यांनी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. पुढे किरण यांनी १९८५ मध्ये अभिनेते अनुपम खेर यांच्याशी लग्न केलं होतं.

१७ जुलै रोजी ‘तन्वी द ग्रेट’ या चित्रपटाचा प्रीमियर सोहळा पार पडला. यावेळी किरण यांनी पती अनुपम यांच्या चित्रपटाला पाठिंबा देण्यासाठी हजेरी लावली होती. किरण यांच्यासह या चित्रपटाच्या प्रीमियरला दिग्दर्शक महेश भट, सुनिधी चौहान, गुलशन ग्रोवर, महिमा चौधरी यांसारख्या कलाकारांनी हजेरी लावली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘तन्वी द ग्रेट’ या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर, या चित्रपटात अभिनेते जॅकी श्रॉफ, अनुपम खेर, अभिनेत्री पल्लवी जोशी, शुभांगी दत्ता यांसारखे कलाकार पाहायला मिळत आहेत. शुभांगी दत्ता या चित्रपटातून मुख्य भूमिकेतून झळकत आहे.