Kirron Kher Talk’s About Husband Anupam Kher : अनुपम खेर बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेते आहेत. आजवर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये वैविध्यपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. परंतु, अभिनेता असो किंवा सामान्य माणूस गंभीर आजार झाल्यानंतर प्रत्येक जण घाबरतोच. असंच काहीसं अनुपम खेर यांच्याबरोबरही झालं होतं. त्यांच्या पत्नी किरण खेर यांना कर्करोगाचं निदान झालं तेव्हा त्यांची कशी अवस्था झालेली याबद्दल त्यांच्या पत्नीनं सांगितलं.

अनुपम खेर यांच्या पत्नी किरण खेर यांना गंभीर आजार झाला होता. किरण यांना कर्करोगाचं निदान झालेलं. त्यांना मल्टिपल मायलोमा, जो ब्लड कॅन्सरचा एक प्रकार असतो त्याचं निदान झालं होतं. ‘न्यूज १८’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबाबत म्हटलं आहे. या मुलाखतीत त्यांच्यासह त्यांचा मुलगा सिकंदरही उपस्थित होता. यावेळी किरण यांनी कर्करोगाबद्दल सांगितलेलं.

मुलाखतीत सिकंदरला जेव्हा त्याच्या आईच्या या आजरपणाबद्दल कळलं तेव्हा त्याची प्रतिक्रिया काय होती याबाबत विचारण्यात आलं होतं. त्यावर तो म्हणाला, “२०२० च्या शेवटी मी माझ्या ‘मंकी मेन’ (Monkey man) चित्रपटाचं इंडोनेशिया येथे चित्रीकरण करत होतो. मी चार महिने तिथे होतो.”

आई किरण यांच्याबद्दल सिकंदर पुढे म्हणाला, “आयुष्यात काही वेळा काही गोष्टी खूप अचानक घडतात तेव्हा तुमच्याकडे काही पर्याय नसतो. मला असं वाटतं की, ती खूप निडर आहे आणि आम्ही प्रत्येक वेळी तिच्याबरोबर असतो.” किरण यावेळी त्यांच्या मुलाबद्दल म्हणाल्या, “मी तुला कधीच भावूक झाल्याचं पाहिलेलं नाहीये. त्यामुळे तू थोडंसं भावूक व्हावं, असं मला वाटत होतं.” त्यावर सिकंदर म्हणाला, “मला तर तिची काळजी न वाटता, त्या आजाराची काळजी वाटत होती. तुला आजार कसा होऊ शकतो.”

सिकंदर पुढे म्हणाला, “तुम्हाला खंबीर व्हावं लागतं. हे काय झालं, असं ज्या व्यक्तीला आजार झाला आहे, तिच्यासमोर म्हणू शकत नाही. जे झालं, त्यामुळे कोणालाही आनंद झालेला नसतो. तो क्षण म्हणजे जगातील सगळ्यात वाईट गोष्ट होती माझ्यासाठी.”

पत्नीला कर्करोगाचं निदान झाल्याचं कळताच अनुपम खेर यांची ‘अशी’ झालेली अवस्था

पती अनुपम यांच्याबद्दल किरण खेर म्हणाल्या, “अनुपम जेव्हा रुग्णालयात यायचा तेव्हा तो खूप घाबरलेला असायचा. अशा वेळी प्रत्येक जण घाबरलेला असतो. पण, जेव्हा अशा गोष्टी होतात तेव्हा तुमच्याकडे त्या गोष्टीचा स्वीकार करण्याव्यतिरिक्त दुसरा कोणताही पर्याय नसतो.”