बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या चांगलीच चर्चेत आहे. अनुष्का दुसऱ्यांदा आई होणार असल्याची चर्चा सगळीकडे रंगली आहे. या चर्चांदरम्यान अनुष्काने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमुळे ती पुन्हा गरोदर असल्याच्या चर्चांना आणखी उधाण आले आहे.

हेही वाचा- तहान, भूक विसरून ‘मन्नत’ बाहेर पाहिली शाहरुखची वाट; ३२ दिवसांनी किंग खानने दिलं चाहत्याला सरप्राईज

काही दिवसांपासून अनुष्का दुसऱ्यांदा गरोदर असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र, त्याबाबत अनुष्का किंवा विराट कोहलीकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य केले गेलेले नाही. दुसऱ्या गरोदपणाच्या चर्चादरम्यान अनुष्काने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट टाकली आहे. अनुष्काने पोस्ट करीत लिहिले आहे. “लोकांचं तुमच्याबद्दलचं मत त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींशी संबंधित आहे हे जेव्हा तुम्हाला समजेल. तेव्हा तुम्हाला कळेल की त्यांचा तर्क एक प्रकारे खर सांगण आहे.” अनुष्काची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रेग्नन्सीच्या अफवांवर अनुष्काची ही प्रतिक्रिया असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
अनुष्का शर्माची पोस्ट

दरम्यान, अनुष्का आणि विराटने एकमेकांना डेट केल्यानंतर २०१७ मध्ये लग्नगाठ बांधली. २०२१ मध्ये अनुष्का आणि विराटची मुलगी वामिका हिचा जन्म झाला. दोघेही आपल्या मुलीला लाइमलाइटपासून दूर ठेवतात. अनुष्का शर्माच्या कामकाजाबाबत बोलायचे झाले तर लवकरच ती ‘चकदा एक्स्प्रेस’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.